कोल्हापूर : कराड शहरात सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाचजणांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात कराड शहर पोलिसांना मंगळवारी यश आले आहेत. यामध्ये इचलकरंजी येथे अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेला बबलू ऊर्फ विजय संजय जावीर (वय ३२ रा. शहापुर इचलकरंजी), निकेत वसंत पाटणकर (रा. गोडोली जि. सातारा,) सुरज नानासो बुधावले (रा. विसापुर पुसेगाव जि. सातारा), राहुल अरुण मेनन (रा. केरळ सध्या रा. विद्यानगर कराड), आकाश आनंदा मंडले (रा. खटाव जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नांवे आहेत. त्यांच्याकडून ३ देशी बनावटीचे पिस्टल, ४ जिवंत काडतुसे, एक धारधार सुरा व दोन कोयते आणि इतर दरोड्याचे साहित्य असा ३ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या टोळीने इचलकरंजीतील एका माजी नगरसेवकाच्या खूनाचा प्लॅन आखला असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, सोमवार (२० मे) रोजी दुपारच्या सुमारास कराड शहर पोलिस ठाण्याकडील गुन्हे शोध पथक शहरात गस्त घालत असताना विद्यानगर जयराम कॉलनी येथे पाचजणांची टोळी सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा