कोल्हापूर : सिद्धगिरी मठाचे एक भव्य उपकेंद्र कर्नाटक राज्यात व्हावे यासाठी राज्य शासना मार्फत जमिनीसह आवश्यक ती मदत करण्यात येईल, अशी घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सोमवारी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर जवळील कणेरी येथील सिद्धगिरी मठ येथे आयोजित ‘सह्रदयी संत समावेश’ संमेलनात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, कर्नाटक शासन हि गो वंश रक्षणासाठी ‘पुण्यकोटी’ प्रकल्पांची आखणी केली आहे. काडसिद्धेश्वर स्वामीजींनी लोकसहभागातून कणेरी मध्ये उभारलेली अभिनव गोशाळा तसेच मठाचे विविध उपक्रम हे एक दिपस्तंभा प्रमाणे काम करेल असा मला विश्वास आहे. लोक कल्याण हेच मठांचे असले पाहिजे या भावनेने कार्य करणाऱ्या सिद्धगिरी मठाचा आदर्श ठेवला तर भारत देश प्रगतीपथावर जाईल.

कर्नाटक भवनासाठी अर्थसहाय्य

यावेळी बोम्मई यांनी सिद्धगिरी येथे बांधण्यात येणाऱ्या कर्नाटक भवनासाठी शासनामार्फत ३ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यात आणखी २ कोटींची मदत करण्यात येणार असल्याचे घोषित केले.

यावेळी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, सिद्धगिरी मठ म्हणजे आध्यात्म आणि समाजोपयोगी प्रकल्पांचे एक केंद्र असून स्वामीजी सर्वांसाठी एक उर्जास्त्रोत आहेत. भाजपचे राष्ट्रीय सचिव बी.एल.संतोष,कर्नाटक सरकार मधील व्ही. सोमन्ना (पायाभूत विकार मंत्री), गोविंद कारजोळ (लघु व मध्यम पाटबंधारे मंत्री), सी.सी. पाटील(सार्वजनिक बांधकाम मंत्री), शशिकला जोल्ले (धर्मादाय, हज व वक्फ मंत्री) महाराज व कर्नाटक प्रांतातील चारशे हून अधिक संत व मठाधिपती  उपस्थित होते. आभार प्रदर्शन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka bhavan will build in siddhagiri math in kaneri cm basavaraj bommai zws