Keshavrao Bhosale Theater Kolhapur Massive Fire संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग धुमसत आहे. ती विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. घटनास्थळी काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, महापालिकेच्या आयुक्त के. मंजू लक्ष्मी, वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी पोहोचले आहेत. शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाचे अलीकडे नूतनीकरण झाले होते. नाट्यगृहामध्ये लाकडी बांधकाम मोठे आहे .

हेही वाचा : Keshavrao Bhosale Theater Fire: कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग

keshavrao bhosale theater reconstruction marathi news
केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी कागदावर! निधीच्या केवळ घोषणाच, चौकशी समितीकडून यंत्रणाही दोषमुक्त
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
3 people suffered with severe eye damage due to lasers light in kolhapur
कोल्हापुरात लेझरमुळे तिघांच्या डोळ्यांना गंभीर इजा; नेत्रविकार तज्ज्ञांकडून बंदी घालण्याची माग
Apte Vachan Mandir passion for innovation Kolhapur news
आपटे वाचन मंदिराला नावीन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास
problem of koyta attacks and traffic congestion on the roads in Pune is serious
पेन्शनरांच्या पुण्याचे हे असे काय झाले?
Kaustubh Pandharipande faces a big challenge of kidney disease
नागपूर : माळरानाच्या संवर्धकासमोर किडनी आजाराचे मोठे आव्हान
lobbying against jayant patil in six assembly elections in sangli district
Battle for Sangli : सांगलीत जयंत पाटील यांना घेरण्याचे प्रयत्न सुरू
Bhagwan Rampure sculptor, Solapur,
सोलापूर : पुतळा उभारताना तांत्रिक गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याचा संशय, ज्येष्ठ शिल्पकार भगवान रामपुरे यांचे ताशेरे

आग लागल्यानंतर या साहित्याने लगेचच पेट घेतला. त्यामुळे आग पसरत गेली. त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न कोल्हापूर महापालिका , विमानतळ अग्निशमन दल यांच्याकडून सुरू आहे. गेल्या तासांहून अधिक काळ आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी यंत्रणा कार्यरत झाली आहे. ती काही प्रमाणामध्ये आटोक्यात आली असली तरी ती पूर्ण थंडावलेली नाही. आगीमध्ये नाट्यगृहाचे बहुतेक साहित्य जळून भस्मसात झाले आहे. कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा उघड्या डोळ्यात देखत बेचिराख झाल्याचे दुःख नाट्यप्रेमींना आहे.