पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने राधानगरी धरण गेल्या आठवड्यात भरले आहे. या धरणाचे सर्व सात दरवाजे आज उघडण्यात आले. केवळ एका तासात दरवाजे उघडल्याने भोगावती नदीपात्रात ११,५०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली असल्याने पंचगंगा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा >>> आता चिखल, दुर्गंधीचा पूर… कोल्हापुरात कचरा, अस्वच्छता, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
political parties in uttar pradesh hail sc judgement on bulldozer action
‘बुलडोझर दहशत’, ‘जंगल राज’ संपेल! निकालाचे विरोधी पक्षांकडून स्वागत; सरकारची सावध प्रतिक्रिया
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान

राधानगरी तालुक्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडला या पावसामुळे धरण काठोकाठ भरले गेले. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात रात्री पावसाचा जोर वाढला. आज बुधवारी एका तासांमध्ये  सातही स्वयंचलित दरवाजे उघडले. धरणातून अकरा हजार पाचशे क्यूसेक्सने भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू असल्याने भोगावती नदीपात्र पूरस्थितीतून वाहत आहे. यावर्षी पहिल्यांदाच राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. भोगावती नदीकाठच्या गावांना जलसंपदा विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हेही वाचा >>> कोल्हापुरात पुराची तीव्रता वाढणार का ? पुन्हा मुसळधारचा इशारा

गेले दोन दिवस पावसाचा जोर कमी होता. धरणाचा विजगृह, सांडवा आणि दोन स्वयंचलित दरवाज्यामधून संथगतीने ४३५६ क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरू होता. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढला पावसाचा जोर इतका भयानक होता की, पहाटे पावणे पाच ते पावणे सहाच्या दरम्यान धरणाचे सर्व दरवाजे उघडले गेले. पहाटे चार वाजुन पन्नास मिनिटांनी पाचव्या क्रमांकाचा दरवाजा उघडला. त्यानंतर केवळ तीन मिनिटांच्या अंतराने तिसरा दरवाजा पाच वाजून सोळा मिनिटांनी चौथा, पहिला दरवाजा पाच वाजून तेहतीस मिनिटांनी, पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी दुसऱ्या क्रमांकाचा दरवाजा उघडला. चोवीस तासांत १७२ मिलिमीटर पाऊस झाला. धरणाचे सातही दरवाजे उघडले. सात दरवाज्यांमधून दहा हजार क्यूसेक आणि विजगृह सांडव्यातून पंधराशे क्यूसेक असा एकूण अकरा हजार पाचशे क्यूसेक्सने भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.