कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग बाबत शासन दिशाभूल करत असून शासन दुटप्पीपणा करत आहे असा आरोप शक्तिपीठ महामार्ग विरोधी‌ संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी केला. ते माणगाव येथे शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित निषेध सभेप्रसंगी बोलत होते.सभेच्या अध्यक्षस्थानी साजणी सरपंच शिवाजी पाटील हे होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २५ जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावरती येणार होते. शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी त्यांना मोर्चा ने येऊन भेटत जवाब दो आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. मुख्यमंत्र्यांनी रडीचा डाव खेळत आपला दौराच रद्द केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आज आपला असंतोष व्यक्त करत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेलाच महामार्ग रद्द करण्याचे निवेदन सादर केले. यादरम्यान मोठा पोलिसी फौज फाटा असल्याकारणाने माणगाव मधील वातावरण तणावपूर्ण बनले होते.

हेही वाचा : ‘बिद्री’च्या इथेनॉल प्रकल्पावरील कारवाईचा कामगारांकडून निषेध; काळ्या फिती लावून दिवसभर कामकाज

यावेळी गिरीश फोंडे म्हणाले, शक्तिपीठ महामार्गास मुख्यमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे असे जरी ते सांगत असले तरी अजून विविध गावांमध्ये गाव चावडीवर नोटीसा चिकटवायचे काम चालूच आहे. मुख्यमंत्र्यांनी शतकोतकर जयंती महोत्सवांमध्ये २६ जून रोजी सहभागी होणे गरजेचे होते. पण ते कोल्हापूरला आलेच नाहीत याबद्दल त्यांचा निषेध करतो. त्यांनी त्वरित महामार्ग रद्द करावा ..शक्तिपीठ महामार्ग हा  ठेकेदार यांना शक्ती देण्याकरिता होत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरपंच शिवाजी पाटील यांनी, शक्तिपीठ महामार्गामुळे  साजणी या माझ्या गावातील जमिन निम्मी जाणार असून भूमिहीन होणारा हा मार्ग कशाला हवा  असा संतप्त सवाल केला. माणगाव कृती समितीचे धनपाल गवळी यांनी , शक्तिपीठ महामार्गामुळे माणगाव गावास पूराचा धोका वाढणार असून बागायती जमिनी नष्ट होणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फ्लेक्स फोटो जवळ शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा या आशायाचे निवेदन ठेवण्याचा प्रयत्न शेतकरी करत होते.पंरतू पोलीस प्रशासन फलक काढून घेताना  झटापटी मध्ये पोलिसांकडून फलक  फाटला. यानंतर आंदोलकांनी भूमी अधिग्रहणाचे नोटीसा चे होळी केली .यामध्ये पोलीसांची तारांबळ उडाली.पोलीस  नोटीस काढून घेण्याचा प्रयत्न  करत असताना गोंधळ उडाला. उपस्थित शेतकऱ्यांनी शासन व शक्तिपीठ महामार्ग विरूध्दात जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी शक्तिपीठ महामार्ग विरोधी शेतकरी कृती समितीचे शिवगोंडा पाटील,‌ प्रकाश पाटील,राजगोंडा बेले,राजू मुगळखोड,युवराज शेटे,सुनिल बन्ने,धन्य कुमार मगदूम,जंबूकुमार चौगुले, प्रकाश पाटील,के.डी.पाटील, शिवाजी कांबळे, जालिंदर कुडाळकर,अंकुश चव्हाण,सुरेश बन्ने,महावीर पाटील, बाळासाहेब गुरव,महावीर देमाण्णा,शामराव कांबळे,अभिजित देमाण्णा,संजय देमाण्णा आदि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माणगाव येथे शक्तिपीठ महामार्गा विरोधात शक्तिपीठ महामार्ग विरोधी शेतकरी कृती समितीकडून शासनाचा अध्यादेशाची होळी करण्यात आली.

हेही वाचा : विधानसभा निवडणुकीमुळे कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत साशंकता – हसन मुश्रीफ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटो समोर निवेदन ठेवण्यात येणार असल्याची कुणकुण हातकणंगले पोलीस स्टेशनला लागताच पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी पोलिस फौजफाटा घेवून आंदोलन ठिकाणी दाखल झाले होते. त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे फोटो ठेवू नका अशी विनंती समन्वयक फोंडे  व शेतकरी यांना करताच‌ आंदोलक व पोलीस यांच्यांत शाब्दिक वादावादी झाली. आम्ही संविधानिक मार्गाने जर सभा घेऊन शांततेत आंदोलन करत आहोत तर पोलीस हे जबरदस्ती मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून करत आहेत का? असा सवाल आंदोलन शेतकऱ्यांनी पोलिसांना करत धारेवर धरले. आंदोलकांनी पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध केला. मुख्यमंत्री व पोलीस प्रशासन यांच्या निषेच्या घोषणा आंदोलकांनी दिल्या.

हेही वाचा : बिद्री कारखान्याचा डिस्टलरी परवाना रद्द; के. पी. पाटील, हसन मुश्रीफ यांना धक्का

आंदोलन नजीक जिल्हापरिषदेच्या शाळेत राष्ट्रगीत सुरू होताच,शेतकरी यांनी  सभा थांबवून राष्ट्रगीताचा आदर राखला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जवाब दो, शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जय जवान जय किसान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, राजर्षी शाहू महाराज की जय, भारत माता की जय अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur agitation to oppose shaktipeeth expressway css