कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये नाताळ सण बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध ठिकाणच्या गिरिजागृहांत प्रार्थना करण्यात आली. ‘मेरी ख्रिसमस’ म्हणत परस्परांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या.
शहरात वायल्डर मेमोरियल चर्च, ख्राइस्ट चर्च, सेंट फ्रान्सिस चर्च, ऑल सेंट चर्च, झेवियर्स चर्च आदी चर्चमध्ये नाताळच्या पूर्वसंध्येला उपासना करण्यात आली. रात्री १२ वाजता फटाक्यांची आतषबाजी करीत नाताळचे स्वागत केले.
हेही वाचा : काळम्मावाडी धरण गळतीची तज्ज्ञांच्या समितीकडून पाहणी
सकाळपासूनच गिरिजागृहांमध्ये ख्रिस्त बांधवांची गर्दी झाली होती. इंग्रजी व मराठीतून ख्रिस्त बोध संदेश उपासकांनी दिला. गरिबांना भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. ख्रिश्चन एकता मंचच्या वतीने आध्यात्मिक सभा, होम मिनिस्टर, विविध स्पर्धा यांचे आयोजन केले आहे. आज कळंबा कारागृहात बंद्यांसाठी शांती प्रार्थना करण्यात आली.