कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे रविवारी एकदिवसीय महिला काँग्रेस जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर होत असताना मोदीजी आणखी किती आश्वासनं देणार, अशी विचारणा करत शिबिराची सुरुवात उपस्थित महिलांच्या हस्ते मोदी सरकारच्या आश्वासनांचे फुगे फोडून व त्यातील वास्तवदर्शक माहिती फलक समोर आणून झाली. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे शिबीर उत्साहात पार पडले. चार सत्रांमध्ये हे शिबीर संपन्न झाले. शिबिरापूर्वी ध्वजारोहण झाले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोल्हापूर शहराच्या आमदार जयश्री जाधव उपस्थित होत्या. प्रास्ताविक महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सरलाताई पाटील यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिले सत्र ‘आजचे स्त्री प्रश्न आणि मानसिकता’ या विषयावर सामाजिक कार्यकर्त्या तनुजा शिपुरकर यांच्या मांडणीने झाले. दुसऱ्या सत्रात ‘लोकशाहीत महिलांची भूमिका आणि आव्हाने’ यावर चर्चा झाली. तिसऱ्या सत्रामध्ये ‘सत्तेची चाल- पावर वॉक’ ऍक्टिव्हिटी झाली. चौथे सत्र ‘जवाहर ते मनमोहन : काँग्रेस प्रधानमंत्र्यांच्या लोककल्याणकारी योजना’ यावर झाले. या सत्रामध्ये शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य ऍड. अभिषेक मिठारी यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर सद्यस्थितीच्या राजकीय चित्रावर भाष्य करणारे स्टँडअप कॉमेडी हे शाहीर रणजित यांनी सादर केले.

हेही वाचा : कोल्हापूर : साहित्यप्रेमींना पर्वणी; शिवाजीराव सावंत स्मृती दालनाचे आजरा गावात थाटात लोकार्पण

समारोप महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव भारती पवार यांनी केला. यावेळी संध्याताई घोटणे , सुलोचना नाईकवडे, मंगला खुडे , चंदाताई बेलेकर, सविता पाटील कुंभोज, बिस्मिल्ला गैबानी इचलकरंजी, गौरी मुसळे, रूपाली चव्हाण, संगीता कांबळे, उज्वला चौगुले, वैशाली जाधव, सुमन ढेरे, दिपाली आवळे, अलका सलगर, राजश्री देसाई, शुभांगी जाधव यांच्यासह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur congress committee criticizes pm narendra modi for his promises to the people of india css
Show comments