आपले लग्न संस्मरणीय व्हावे, अशी प्रत्येक लग्न करणाऱ्याची इच्छा असते. यासाठी नवनवीन कल्पनांचा अवलंब होतानादेखील दिसून येतो. याच धर्तीवर कोल्हापूरमधील एका व्यक्तीने आपले लग्न संस्मरणीय व्हावे म्हणून हवेत लटकलेल्या अवस्थेत सप्तपदी केली. यावेळी वधु-वरासोबत भटजींनादेखील हवेत लटकावे लागले. कोल्हापूर येथील ३४ वर्षीय जयदीप जाधवने २८ वर्षीय रेश्माशी लग्नगाठ बांधली. हे लग्न संस्मरणीय व्हावे म्हणून वधु-वराने हवेत लटकत सप्तपदी पूर्ण केली. जयदीप आणि रेश्माने जमिनीपासून जवळजवळ ३०० फूट (९० मीटर) उंचीवर एकमेकांना वरमाळा घातली. मला लग्न आगळ्यावेगळ्या पद्धतीने करायची इच्छा होती. याबाबात मी मित्रपरिवाराशी चर्चा केली. खूप शोधाशोध केल्यानंतर या ठिकाणी लग्न करण्याचे निश्चित झाले. याच ठिकाणी १७ वर्षांपूर्वी मी गिर्यारोहण करण्यास सुरुवात केली होती, अशी माहिती वराने दिली. लग्नबंधनात अडकलेल्या या जोडीला ट्रेकिंगची प्रचंड आवड आहे. इतकेच नव्हे तर दोघांची भेटदेखील एका ट्रेकदरम्यानच झाली होती. कालांतराने दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. त्यांच्या याच समान आवडीमुळे दोघे लग्नबंधनातदेखील अडकले. हवेत सप्तपती करताना वधु, वर आणि भटजींच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली होती. खोल दरीवर हवेत उंच लटकत लग्न करणे धोक्याचे तरीही या अदभूत लग्नसोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अनेकजण उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा