कोल्हापूर : जे लोक निवडून येण्याची शक्यता नाही. सत्तेत तर मुळीच येणार नाहीत. असेच लोक जनतेला अमुक तमुक वस्तू फुकट देण्याच्या पोकळ घोषणा करीत आहेत हेच मुळी आश्‍चर्याचे आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांचा लाभार्थी प्रत्येक घरात आहे. धैर्यशील माने यांना मतदान म्हणजेच मोदींना मतदान होय, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हातकणंगलेतील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ इचलकरंजी येथे आयोजित सभेत हाळवणकर बोलत होते. ते म्हणाले, मोदींना हटवा हा एकच अजेंडा विरोधकांचा आहे. मोदी आल्यास त्यांचा भ्रष्टाचार बंद होणार असल्याने ते सर्वजण एकत्र आले आहेत. सौर ऊर्जेच्या माध्यमातून घराघरात मोफत वीज उपलब्ध होणार आहे. सामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मोदींशिवाय पर्याय नाही. मनसेचे पुंडलिक जाधव म्हणाले, मोठ्या प्रमाणात विकास निधी मतदारसंघात आणण्याचे काम धैर्यशील माने यांनी केले असल्याने त्यांना पुन्हा संधी देण्याची गरज आहे.

हेही वाचा – सांगली : प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून एकमेकांना शुभेच्छा

हेही वाचा – महाराष्ट्रात दुष्काळात चारा पाठविला म्हणून ‘अमूल’वर मोदींनी भरला होता खटला, शरद पवार यांचा आरोप

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, मनोज हिंगमिरे, अनिल डाळ्या, निवास कांबळे, जहाँगिर पटेकरी, उत्तम विभुते, राजाराम पोवार आदींसह भागातील नागरिक उपस्थित होते.