कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शेतकऱ्यांशी घट्ट नाळ आहेच. बँक आता छोटे -मोठे दुकानदार, व्यापारी, व्यावसायिक आणि उद्योजकांच्या दारात जाणार आहे. बँकेच्यावतीने क्यूआर कोड स्टॅन्डीसह साउंड बॉक्स सुविधा पुरविण्याची महत्वकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत येत्या दोन महिन्यात एक लाख ग्राहकांपर्यंत क्यूआर कोड पोहोचवण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. या ग्राहकांना बँकेच्यावतीने भरघोस विमा सुविधा देण्याचा बँकेचा मानस आहे.

आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याची माहिती महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी दिली. या मोहिमेत सर्व संचालकांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन काम करण्याचे आवाहन, अध्यक् मुश्रीफ यांनी केले.

25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
t Plus zero transaction system
आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये ३१ डिसेंबरपासून ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणाली
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
PAN 2 0 is going Digital Will you still need a physical PAN card as ID proof and KYC document
PAN 2.0 आता डिजिटल होणार: अजूनही फिजिकल PAN कार्डची गरज भासेल का?
Pune and Pimpri Chinchwad may raise PMPML ticket prices due to rising operational deficit
पीएमपी तिकीट दरवाढीचे भवितव्य, ‘दादांच्या ‘ हाती, काय निर्णय घेणार ?
Dombivli tax arrears people, Dombivli property seal,
डोंबिवलीत मालमत्ता कर थकबाकीदारांच्या गाळ्यांना टाळे

हेही वाचा : इचलकरंजी महापालिकेची अतिक्रमण मोहीम दुसऱ्या दिवशीही सक्रिय; हातगाडे, फलक जप्त

बँकेकडे ठेवींचा ओघ मोठा आहे. रिझर्व बँकेने एकूण ठेवींमध्ये चालू खात्याच्या व बचत खात्यांच्या ठेवी म्हणजेच कासा ठेवीचे प्रमाण किती असावे, याचे नियम घालून दिले आहेत. या ठेवींची पूर्तता अधिक चांगली होण्यासाठी बँकेने ही मोहीम हाती घेतली आहे. या अत्याधुनिक सुविधेमुळे ग्राहकांचा वेळ व प्रवासाची बचत होऊन कार्यालयांसह घरबसल्या सुविधा मिळणार आहे. या योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी कोल्हापूर शहरासह प्रत्येक तालुकास्तरावर संबंधित संचालकांमार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. या मोहिमेची सुरुवात पालकमंत्री व अध्यक्ष मुश्रीफ कागलपासून स्वतः करणार आहेत.

बँकेने गेल्या आर्थिक वर्षाअखेर २४० कोटी रुपयांचा उच्चांकी ढोबळ नफा कमविलेला आहे. कोल्हापूर शहरासह सबंध जिल्हाभरातील तालुक्याची गावे, मोठ्या बाजारपेठा, मोठी गावे व इतर ठिकाणचे व्यापारी, व्यावसायिक व उद्योजकांकडे जाण्यासाठी बँकेने ही मोहीम हाती घेतली आहे. कारण असे दुकानदार, व्यवसायिक, उद्योजक व व्यापाऱ्यांना त्यांच्या कामाच्या व्यापातून दररोज बँकेकडे येता येत नाही. त्यामुळे या माध्यमातून बँकच त्यांच्या दारी चाललेली आहे. दरम्यान; रिझर्व बॅंकेने व नाबार्डने दिलेल्या एक्सपोजरच्या मर्यादेमुळे कर्ज देताना मर्यादा आलेली आहे. त्यासाठी ग्रामपंचायती, किराणा दुकानदार, हॉटेल व्यवसायिक, व्यापारी हे छोटे व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक, दुकानदार, भाजीपाला विक्रेते आदी व्यावसायिकांशी ठेवीदार ग्राहक म्हणून संबंध प्रस्थापित होणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी क्यू आर कोडसह साउंड बॉक्स सुविधा पुरविण्यात येणार आहे. त्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमधून बँकेकडे कासा ठेवींचा ओघ वाढणार आहे.

हेही वाचा : इचलकरंजी महापालिकेच्या शाळांची दुरवस्था; प्रशासनाचा भोंगळ कारभारच जबाबदार

मुश्रीफ म्हणाले, केडीसीसी बँक ही शेतकऱ्यांची बँक असून प्रामुख्याने शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जातो. तसेच; साखर कारखाने, सूतगिरण्या, प्रक्रिया संस्था, खरेदी विक्री संघ अशा संस्थांसह व्यक्तींना कर्ज पुरवठा केला जातो. परंतु; रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि नाबार्डच्या कर्ज मर्यादेच्या (एक्सपोजर) निकषांनुसार कर्जपुरवठा करण्यास मर्यादा येतात. याकरीता व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक व उद्योजक असे ग्राहक बँकेस जोडणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी अशा ग्राहकांना क्यूआर कोड देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.

विनाशुल्क जोडणी!

ग्राहकांना ही सुविधा विनाशशुल्क जोडणावळ करून दिली जाणार आहे. क्यू आर कोडच्या व्यवहाराच्या माध्यमातून ग्राहकाला बँकेकडे त्याच्या इच्छेनुसार दैनंदिन संचयनी म्हणजेच पिग्मी खात्यामध्ये इच्छेनुसार रक्कम ठेवता येणार आहे. क्यू आर कोडसारख्या अत्याधुनिक व अद्ययावत सुविधेच्या माध्यमातून सुरक्षित मानवरहीत स्वयंचलित पिग्मी म्हणजेच भिशी सुविधा ग्राहकांना दिली जाणार आहे. या पिग्मीवर ग्राहकांना अत्यल्प व्याजदराचे कर्जही दिले जाणार आह.

हेही वाचा : शंभूराजे देसाई, हसन मुश्रीफ यांना घाबरणार नाही – रवींद्र धंगेकर

उपाध्यक्ष आमदार राजू आवळे, आमदार राजेश पाटील, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, प्रा.अर्जुन आबिटकर, विजयसिंह माने, स्मिता गवळी आदी संचालक, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे व आय. बी. मुन्शी व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे उपस्थित होते.

Story img Loader