कोल्हापूर : मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी चांगला पाऊस झाला तर अनेक ठिकाणी तो तुरळक प्रमाणांत बरसला. मृगाची चंगली सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांचा उत्साह दुणावला आहे. जून महिना सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप खरिपाची तयारी सुरू केली आहे.
हेही वाचा >>> आव्वाजचं बंद! जप्त सायलेन्सरवर पोलिसांनी फिरविला रोड रोलर; गडहिंग्लजमध्ये भर चौकात पोलिसांची अनोखी कारवाई
पावसावर खरिपाचे सारे गणित अवलंबून असते. पावसाचे ऋतुमान अलीकडच्या काळामध्ये बदललेले आहे. मान्सून दाखल झाला तरी पावसाचे दीर्घकाळ दर्शन होत नसल्याचा अनुभव आहे. यावर्षी पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. सात जून रोजी मृग नक्षत्राला सुरुवात होते. ही सम साधून पाऊस आल्याने शेतकऱ्यांचा उत्साह दुणवला आहे. मृगाचा पाऊस आला की पीक पदरात पडते असे गणित शेतकऱ्यांनी अनुभवांती बांधलेले आहे. पावसाने योग्य वेळी सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. आज कागल, करवीर, गगन बावडा, पन्हाळ, शाहूवाडी, चंदगड, भुदरगड, हातकणंगले तालुक्यामध्ये मान्सूनने हजेरी लावली.