कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाने कार्यक्षेत्राबाहेरील गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर ३० रुपये करण्याचा निर्णय रविवारी घेतला. राज्यात खाजगी व इतर दूध संघांचे गाय दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर २७ रुपये पर्यंत कमी झाले होते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
गाय दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले. त्यासाठी ३० रुपये दर देण्याची अट आहे. गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिलिटर ३३ रुपये तर जिल्ह्याबाहेर २८.५० रुपये दर देत आहे.
हेही वाचा…विशाळगड अतिक्रमण मुक्त करावा; हिंदुत्ववाद्यांची मागणी
गाय दूध अनुदानास पात्र होण्यासाठी गाय दूध खरेदीचा दर प्रतिलिटर ३० रुपये करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली.
First published on: 07-07-2024 at 20:32 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur gokul milk sangh increases cow milk purchase to qualify for government subsidy psg