कोल्हापूर : बोगस फेसबुक खात्याचा फटका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाही बसला आहे . त्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडण्यात आले आहे. याप्रकरणी कागल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे छायाचित्र वापरून कोणीतरी बोगस खाते फेसबुकवर काढले आहे. त्यामध्ये मुश्रीफ यांचा जुना फोटो जोडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : कोल्हापुरातील मालवाहतूक ठप्प; दोन हजारांहून अधिक ट्रक अडकले, ४० कोटींची उलाढाल ठप्प

बनावट फेसबुक अकाउंटवरील छायाचित्रात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हसन मुश्रीफ भेट घेत आहेत, असे दाखवले आहे. तसेच सोबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हेही आहेत. या फोटोतून हसन मुश्रीफ हे पुन्हा महाविकास आघाडीशी जोडले गेले आहेत, असे दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. असे बोगस खाते निदर्शनास येताच मंत्री हसन मुश्रीफ यांनी ते राहत असलेल्या कागल या गावातील पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur guardian minister hasan mushrif fake facebook account case registered in kagal police station css
Show comments