कोल्हापूर : वस्त्रनगरी इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर सण उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सायंकाळी गावभागातील जुनी गावचावडी येथे मानाचा पारंपारिक कर (दोर) तोडण्याचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये धाकल्या पाटलांच्या बैलाने कर तोडला. आणि बेंदूर प्रेमी नागरिकांनी एकच जल्लोष केला.

प्रतिवर्षाप्रमाणे शहर व परिसरात कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून गाय-बैलांना न्हाऊ माखू घातले जात होते. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घालून पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला गेला. त्याचबरोबर घरोघरी मातीचे बैल आणून त्यांची हरभरर्‍याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून मनोभावे पुजा करुन पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. बैलांना सजविण्यासाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी बाजारपेठेत मांडण्यात आलेल्या स्टॉलवर बळीराजाने गर्दी केली होती. सकाळपासून बैलांना आंघोळ घालून त्यांना विविध आकर्षक रंगांनी व फुलांनी सजवून त्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येत होती. शहरात अनेक ठिकाणी कर तोडण्याचा कार्यक्रमही पार पडला.

Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला
Mallikarjun Kharge criticize BJP in nagpur
“बाटना और काटना हे भाजपचे काम” मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
maharashtra pollution control board to submit report to ngt on noise pollution
सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल
Kharutai
“अशी भाऊबीज कधीही पाहिली नसेल!”, तरुणीने चक्क खारूताईला ओवाळले, Viral Video पाहून चक्रावले नेटकरी
youth killed in bike accident in pune
बोपदेव घाटात दुचाकी घसरुन सहप्रवासी तरुणाचा मृत्यू

हेही वाचा : हद्दवाढ करा; अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोल्हापूर बंदी, काळे झेंडे दाखवणार

सायंकाळी शतकोत्तर परंपरेनुसार इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्यावतीने गावभागातील महादेव मंदिरनजीक पारंपारिक पध्दतीने कर तोडण्याचा कार्यक्रम देवाशिष पाटील, शिवांशिष पाटील यांच्या हस्ते पार पडला. तत्पूर्वी उत्सव कमिटीच्यावतीने घेण्यात आलेल्या लाकूड ओढण्याच्या शर्यती व जनावरांच्या प्रदर्शनातील विजेत्यांना माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, पोलीस उपाधीक्षक समिरसिंह साळवे आदी मान्यवरांचे हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

लाकूड ओढणे शर्यतीत लहान गटात गणेश साळुंखे (प्रथम), बिलाल पटवेगार (द्वितीय), चंद्रकांत सातपुते (तृतीय) तर मोठ्या गटात यश बेलेकर (प्रथम), दीपक पाटील (द्वितीय) व चंद्रकांत बंडगर (तृतीय) यांच्या बैलांनी यश मिळविले. सुट्टा बैल पळविणे स्पर्धेमध्ये बादल ग्रुप च्या बैलाने प्रथम, हरीष खरात यांच्या बैलाने द्वितीय तर उमेश कोळेकर यांच्या बैलाने तृतीय क्रमांक मिळविला.

हेही वाचा : कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये शिवसेनेची मशालच पाहिजे; शिवसैनिकांचा आग्रह

याप्रसंगी उत्तम आवाडे, प्रकाश दत्तवाडे, बाबासाहेब पाटील, गजानन लोंढे, आर. के. पाटील, राहुल घाट, किशोर पाटील, नरसिंह पारीक, महावीर जैन, शेखर शहा, सतीश मुळीक, नितेश पोवार, बाबू रुग्गे, काशिनाथ गोलगंडे, शैलेश गोरे, अविनाश कांबळे, संजय केंगार आदिसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बेंदूर कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते, उपाध्यक्ष नंदु पाटील, अहमद मुजावर, पापालाल मुजावर, शांतापा मगदूम, सागर मगदूम, शिवाजी काळे, राजेंद्र दरीबे, बजरंग कुंभार, सागर गळदगे, इरफान आत्तार, सागर कम्मे आदींसह गावकामगार पाटील, पोलिस पाटील यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन राजेंद्र बचाटे यांनी केले.