कोल्हापूर: सलग आलेल्या सुट्टीमुळे कोल्हापुर फुलले आहे. पर्यटक आणि वाहनांच्या गर्दी कोल्हापूर हरवले आहे. श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग पाहायला मिळत आहे. भवानी मंडप आवारात दुतर्फा रांगा लागल्या. कोल्हापूरसह जोतिबा, पन्हाळा, नृसिंहवाडी, खिद्रापूरसह अन्य पर्यटन स्थळांवर गर्दी झाली.
शनिवार ते बुधवार अशा सलग सुट्ट्या आहेत. साहजिकच पर्यटक, भाविकांची पावले कोल्हापूरकडे वळली आहेत. महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वारापासून दूरवर भाविकांची रांग दिसत आहे.
हेही वाचा… शियेतील स्पर्धा परीक्षा केंद्रावर कारवाई करण्याची मागणी
सरलष्कर भवन समोरील प्रवेशव्दाराच्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र देववस्थान व्यवस्थापन समितीने बॅरिकेट लावून गर्दीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला. रंकाळा चौपाटी, न्यू पॅलेस, कणेरी मठ, खिद्रापूर, जोतिबा आणि पन्हाळा येथेही गर्दी झाली आहे. धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गसौदर्यंची उधळण करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला दीड लाखांवर अधिक पर्यटकांनी भेट दिली.