कोल्हापूर : प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका आयुक्त तसेच करवीर व इचलकरंजी उपविभागीय अधिकाऱ्यांना उद्या मंगळवारी पंचगंगा नदी प्रदूषण संबंधित घटकांची संयुक्त पाहणी करण्याकरता उपस्थित राहण्याबाबत सोमवारी निर्देश दिले आहेत.

पंचगंगा नदी प्रदूषणामध्ये सतत वाढ होऊ लागली असताना ते रोखण्याबाबत शासकीय यंत्रणेची बेपरवाई दिसून येत आहे. याबाबत संयुक्त पाहणी करण्यात यावी अशी मागणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेले प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पत्र पाठवले होते. १२ मे रोजी कोल्हापुरातील पंचगंगा नदीत मिसळणाऱ्या नाल्याची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर महापालिका, करवीर उपविभागीय अधिकारी यांच्या प्रतिनिधीना उपस्थित राहण्यास कळवूनही ते अनुपस्थित राहिले होते. त्यानंतर देसाई यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे निदर्शनास आणून दिले.

drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
maharashtra assembly election 2024, Mahayuti Campaign, Palghar, Dahanu,
महायुतीच्या प्रचारात गुजरातमधील निरीक्षकांची देखरेख
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त
Ajit Pawar lashed out at the group over the issue of disclaimer regarding the clock symbol print politics news
घड्याळाबाबत अस्वीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवार गटाला फटकारले

हेही वाचा – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करण्यासाठी निर्भय पदभ्रमंती

हेही वाचा – कोल्हापूर : राधानगरीत गव्याच्या हल्ल्यात तिघे जखमी; मोटारीचे नुकसान

याची होणार पाहणी

त्यानुसार उच्च न्यायालयातील प्रतिवादी असलेले कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका आयुक्त तसेच करवीर व इचलकरंजी उपविभागीय अधिकारी यांनी पंचगंगा नदी, नदीला मिळणारे नाले, एसटीपी प्रकल्प संबंधित घटक इत्यादींची संयुक्त पाहणी करण्यात येणार आहे. यासाठी न चुकता उपस्थित रहावे, जेणेकरून उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे पत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी ज. शं. साळुंखे यांनी सोमवारी पाठवले आहे.