कोल्हापूर : लोकशाहीमध्ये आपापल्या उमेदवारांचा प्रचार करण्याची सर्वांनाच मुभा आहे. कोणी जाणीवपूर्वक आमच्या आडवे येत असेल तर मी सुद्धा याच मातीत २५ वर्षे कसलेला पैलवान आहे. कोणाला कसे चितपट करायचे हे चांगलेच माहिती आहे. कोणत्याही बारक्या कार्यकर्त्यांनी माझ्या आड येण्याचे धाडस करू नये, असा इशारा कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिला. महाविकास आघाडीचे कोल्हापुरातील उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचाराची सभा वडणगे (ता. करवीर) येथे झाली. यावेळी आमदार पाटील बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ते म्हणाले, कोल्हापुरात गोळीबाराच्या घटना घडत आहेत. भाजपच्या सरकारमध्ये कायदा सुव्यवस्थेची अवस्था बिकट झाली आहे. महाराजांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याने आपली तटबंदी मोडायचा प्रयत्न होईल. कोणी त्रास देत असेल तर मला सांगा. रात्री बारा वाजता काठी घेऊन तेथे यायला बंटी पाटील तयार आहे.

हेही वाचा : कोल्हापुरात औद्योगिक विकासासाठी उद्योगासाठी ६५० हेक्टर जमीन उपलब्ध करणार – उदय सामंत

हीच का मोदी गॅरेंटी ?

विरोधक पदयात्रा घेऊन भागात येतील. तेव्हा त्यांच्यासमोर सिलेंडरचा गॅस ठेवून ४०० रुपयांची किंमत १२०० रुपये कशी झाली, हीच कामे मोदी गॅरेंटी आहे का? असा प्रश्न त्यांना विचारावा, असे आवाहन सतेज पाटील यांनी उपस्थित महिलांना केले.