कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात श्रीमंत शाहू महाराज विरुद्ध खासदार संजय मंडलिक यांच्यातील लढत अटळ असली तरी त्यावर अंतिम मोहोर उमटायची आहे. त्याआधीच जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सलामीची रंगलेली खडाखडी पाहता हा आखाडा भलताच रंगणार याची झलक दिसू लागली आहे.

कोल्हापुरात शिंदेसेनेचे संजय मंडलिक हे संसद सदस्य आहेत. उमेदवारी मिळणार हे गृहीत धरून त्यांनी ग्रामीण भागात विविध कामांचा शुभारंभ करीत मतदानासाठी आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. मंडलिक यांच्या विरोधात कोण ही चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शाहू महाराज यांची भेट घेतल्यापासून त्यांचे नाव झपाट्याने पुढे आले आहे. त्यानंतर त्यांनीही तुतारी शुभचिन्ह आहे. ती सगळीकडे वाजताना दिसेल, तुम्हाला अपेक्षित असणारी बातमी, ब्रेकिंग न्यूज लवकरच मिळेल, असे विधान करीत आपल्या उमेदवारीचे संकेत द्यायला सुरुवात केली आहे.

Ratnagiri, Ratnagiri, former MLA Ratnagiri,
रत्नागिरी जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांच्या वारसदारांचे राजकीय भवितव्य लवकरच जाहीर होणार
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Anuradha Nagwade, Rajendra Nagwade,
अहिल्यानगर जिल्ह्यात अजित पवारांना मोठा धक्का! ‘या’ नेत्यांसह कार्यकर्त्यांचे राजीनामे
Ajit Pawar news, Ajit Pawar Parner, Ajit Pawar latest news, Ajit Pawar marathi news, Ajit Pawar news in marathi news,
VIDEO : सभेत कार्यकर्त्यांच्या बॅनर फडकवत घोषणा; ‘ज्या गावच्या बोरी त्याच, गावच्या बाभळी’ असं म्हणत अजित पवारांनी खडसावलं
challenge to Narayan Rane candidacy, Narayan Rane news,
नारायण राणेंच्या खासदारकीला आव्हानाचे प्रकरण : जप्त मतदान यंत्र पुन्हा निवडणूक आयोगाच्या ताब्यात
politely battle in 46 assembly constituencies in Marathwada
मराठवाड्यात पुन्हा एकदा ‘ जोडू या अतुट नाती’ चा खेळ
Deputy Chief Minister Ajit Pawar NCP will contest assembly elections from Pathri constituency print politics news
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पाथरीवर लक्ष
uddhav Thackeray
‘मविआ’मधील जागावाटपात ठाकरे गटाची कोंडी? नगर जिल्ह्यात हक्काचा मतदारसंघ नाही

हेही वाचा – सांगलीत भाजपचे धक्कातंत्र ?

माजी खासदार संभाजीराजे यांनी कोल्हापूरसह राज्यात स्वराज्य पक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार बोलून दाखवला होता. त्यामुळे रिंगणात शाहू महाराज की संभाजीराजे असा गुंता निर्माण झाला होता. पण काल संभाजीराजे यांनी शाहू महाराज यांच्यासाठी निवडणूक लढवणार नाही. राज्यात कोठेही स्वराज्य पक्ष निवडणूक लढवणार नाही, असे सांगून पडदा टाकला. त्यांच्या या भूमिकेवरून भाजपचे राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांनी टीका केली आहे. कालपर्यंत संभाजीराजे निवडणूक लढवण्याची जोरदार भाषा करत होते. आता त्यांनी अचानक माघार घेतल्याने त्यांच्या समर्थकांना हा धक्काच असेल, असे म्हणत संभाजीराजेंच्या तलवार म्यान करण्यावर बोचरी टीका केली.

विरोधकांनी शाहू महाराजांच्या वयावर टिप्पणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरूनही संभाजीराजे यांनी महाराज आजही सक्रिय आहेत. ते पूर्वी कुस्तीगीर होते. त्यांचे वय विचारणाऱ्यांना मोदींचे वय माहीत नाही का, अशी विचारणा करीत थेट मोदींना वादात ओढले. त्यावर खासदार महाडिक यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय आणि कार्य देशाने पाहिले आहे. २५ वर्षे एकही दिवस सुट्टी न घेता काम करत आहेत. त्यांच्या वयाबद्दल कोणी बोलू नये, असा प्रतिटोला लगावला आहे. त्यामुळे शाहू महाराजांचे वय हा प्रचारातील वादाचा मुद्दा ठरतो की काय असे दिसू लागले आहे.

आजी-माजी पालकमंत्र्यात जुगलबंदी

दुसरीकडे, शाहू महाराज हे उमेदवार असणार का, त्यांनी या वयात निवडणूक लढवावी का यावरूनही मतांतरे व्यक्त होत आहेत. खासदार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज हे उमेदवार असतील असे वाटत नाही. जरी ते उमेदवार असतील तर आमचे वडिलकीचे नाते बदलणार नाही. ही निवडणूक दोन पक्षांतील विचारांवर होईल, अशी संयत भूमिका मांडली. तर, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराज आमच्या सर्वांचे आदर्श आहेत. त्यांनी राजकारणात यावे की न यावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांचे आदर्श स्थान कायम राहावे असे वाटते, असे नमूद करताना निकाल कसा लागणार यावर सूचक टिप्पणी केली.

हेही वाचा – राज्यातील जागावाटपात तीन तिघाडा नाराजांचा बिघाडा

जिल्ह्यातील दोन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी जिवाचे रान करणार असल्याचे मुश्रीफ यांनी नमूद केले. त्यांच्या या टिप्पणीचा संदर्भ देत माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी शाहू महाराज यांना आदर्श मानता तर त्यांना बिनविरोध निवडून द्यावे, असे आवाहन केले. सक्षम उमेदवार देणे आणि तो भाजप विरोधात निवडून आणणे हे आमचे धोरण आहे. शाहू महाराज यांचे पुरोगामी विचारांचे नेतृत्व दिल्लीपर्यंत जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याआधीच शाब्दिक चकमकी सुरू झाल्याने कोल्हापूरचा आखाडा असा तापत आहे.