कोल्हापूर : समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची गावागावात मजबूत बांधणी झाली आहे. राजे व मंडलिक गटाची युती गत लोकसभा तसेच बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत राहिली. हाच एकोपा कायम ठेवत राजे – मंडलिक गट येत्या काळात समन्वयाने काम करेल, असा विश्वास कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कागल येथे विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे होते. खासदार मंडलिक पुढे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा वारसा स्व. सदाशिवराव मंडलिक व स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी प्रत्यक्ष कृतीतून चालवला. समरजितसिंह घाटगे आणि आम्ही तोच वारसा डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करीत आहोत.

हेही वाचा – हातकणंगलेत सत्यजित पाटील सरूडकर यांच्या हाती मशाल

हेही वाचा – कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

व्यक्तिगत टीका टाळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम व केंद्राच्या कल्याणकारी योजना मतदारांपर्यंत पोहोचवा. प्रचाराच्या रणधुमाळीत व्यक्तिगत टीका -टिप्पणी टाळा, असे आवाहन समरजितसिंह घाटगे यांनी केले. स्वागत युवराज पाटील, प्रास्तविक प्रा. सुनिल मगदूम, आभार बॉबी माने यांनी मानले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur lok sabha raje mandlik group will continue to work in coordination mp sanjay mandlik ssb