कोल्हापूर : गायीच्या दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी गुरुवारी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. गेल्या काही दिवसांपासून गोकुळ दूध संघाने गायीच्या दुधात प्रति लिटर ४ रुपये आणि ३ रुपये अशी दोन वेळा कपात केली आहे. दूध दरात कपात केल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. ही कपात मागे घेण्यात यावी, गायीच्या दुधाला राज्य शासनाने जाहीर केलेले ७ रुपयांचे अनुदान कायमस्वरूपी लागू करावे, प्रति लिटर ४० रुपये दर मिळावा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दसरा चौकात गायीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गायीसह हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर येथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरवाढ नाकारल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा दूध उत्पादक संघटनेचे अध्यक्ष ज्योतीराम घोडके, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वकील माणिक साळुंखे यांनी दिला.