कोल्हापूर : शिवसेना कशा पद्धतीने निवडणूक लढवते हे लोकसभा, विधानसभेवेळी दिसून आले आहे. आतापर्यंत आम्ही कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकणार असे राजकीय हेतूने म्हणत होतो. परंतु कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचा भगवा निश्चितपणे फडकणार हे जबाबदारीने सांगतो, असे मत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
या वेळी त्यांनी कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ निश्चितपणे होईल, असा दावा केला. ते म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याची हद्दवाढ २२ वेळा झाली असल्याचे विधान केले आहे. पुणे महापालिकेची हद्दवाढ झाल्याने ग्रामीण भागातील जमिनीच्या किमतीमध्ये वाढ झाली आणि तेथे महापालिकेच्या चांगल्या पायाभूत सुविधा मिळू लागल्या.
हेही वाचा : विकासकामांना कात्री पणलाडक्या बहिणींना २१०० रुपये; हसन मुश्रीफ यांची ग्वाही
हद्दवाढ निश्चितपणे होईल
कोल्हापूरमध्येही अशाच पद्धतीची भूमिका घेणे गरजेचे आहे. परंतु शहर व ग्रामीणमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. याही बाबतीत आम्ही कोठे तरी कमी पडलो का, याचाही विचार होणे गरजेचे आहे. हद्दवाढीबाबतचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न राहणार आहे. कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ निश्चितपणे होईल, याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून, लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.