मुंबई उच्च न्यायालयाच्या सíकट बेंचला उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्याकडून हिरवा कंदील मिळेल, ही अपेक्षा मंगळवारी फोल ठरली. शहा यांनी निवृत्तीच्या दिवशी सíकट बेंचचा निर्णय घोषित न केल्याने संतप्त झालेल्या वकील व पक्षकारांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर निवृत्त न्यायाधीश शहा यांचा तिरडी मोर्चा काढला. तसेच बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस न्यायालयीन कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आला. १० सप्टेंबर रोजी बार असोशिएशनच्या वतीने कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे.
कोल्हापूर येथे सíकट बेंच स्थापन करण्याचा ठराव मंत्रिमंडळाने यापूर्वीच मुख्य न्यायाधीशांकडे पाठविला होता. न्या. शहा हे मंगळवारी निवृत्त झाले. निवृत्त होण्यापूर्वी ते कोल्हापूरला सíकट बेंच या निर्णयावर निर्णय घोषित करतील अशी अपेक्षा होती. त्यासाठी सहा जिल्ह्यांतील वकिलांच्या नजरा मुंबईकडे लागल्या होत्या. मात्र निवृत्त होण्यापूर्वी मुख्य न्यायाधीशांनी असा कोणताही निर्णय घेतला नाही. याची माहिती सायंकाळी वकील व पक्षकारांना समजली. त्यामुळे संतप्त पक्षकार व वकिलांनी निवृत्त न्यायाधीशांचा तिरडी मोर्चा काढला. त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
सíकट बेंचचे आंदोलन तीव्र करण्याच्या उद्देशाने बार असोशिएशनची रात्री तातडीची बठक झाली. त्यामध्ये बुधवार, गुरुवार व शुक्रवार असे तीन दिवस न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. १० सप्टेंबर रोजी कोल्हापूर बंदची हाक दिली असून त्यामध्ये राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा