कोल्हापूर महापालिका प्रशासनाचा इशारा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जैव वैद्यकीय कचरा प्रकल्पाचा वापर करायचा, पण त्याचे शुल्क अदा न करण्याची वृत्ती शहरातील रुग्णालय व डॉक्टर यांना नडणार आहे. अशा प्रकारे देयके अदा न करणाऱ्या व्यावसायिकांकडील जैव वैद्यकीय कचरा उठाव बंद करणार असल्याचा इशारा सोमवारी प्रशासनाने दिला आहे.

पालिकेच्या ठेकेदाराकडून रुग्णालय वा तत्सम व्यावसायिकाकडील जैव वैद्यकीय कचरा उठावाचे काम बंद केलेस अशांनी व्यवसायातून निर्माण होणारे जैव वैद्यकीय कचऱ्याचे विल्हेवाटीची जबाबदारी स्वत घ्यावी , असे सांगण्यात आले आहे .  कोणत्याही प्रकारचा जैव वैद्यकीय कचरा उघडयावर टाकलेचे निदर्शनास आल्यास  संबंधित भागातील वैद्यकीय व्यावसायिकांना जबाबदार धरून त्यांचेवर कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हणत प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे .

कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारच्या वैद्यकीय व्यावसायिकांकडून दैनंदिन निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचरा संकलन, वाहतूक, प्रक्रिया व शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणेकामी जाहीर निविदा प्रक्रियेअंती  नेचर इन नीड, बीएमडब्लूटी सव्‍‌र्हीसेस या संस्थेची नेमूणक करणेत आली होती.  वैद्यकीय व्यावसायिकांकडून आकारावयाच्या शुल्काचे दरासंबंधी या संस्थेबरोबर सर्व वैद्यकीय व्यावसायिक संघटनांचे सहमतीने सुधारित करारपत्र करणेत आले होते. तथापि सदर संस्थेचा ठेका  महानगरपालिकेने रद्द केला असून याविरोधात या संस्थेने  हरित अधिकरण न्यायालय, पुणे यांचेकडे दावा दाखल केला.

शहरातील दैनंदिन निर्माण होणाऱ्या  जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाटीचेकामी महानगगरपालिकेने नव्याने निविदा प्रक्रिया राबवायची असल्याने  दरम्यानचे कालावधीत नेचर इन नीड यांनी शहरातील जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाटीचे काम नियमितपणे करावे, असा आदेश दिला . या  न्यायालयीन आदेशानुसारच सध्या नेचर इन नीड यांचेकडून शहरातील जैव वैद्यकीय कचरा निर्मूलनाचे काम सुरू आहे.

याअनुषंगाने शहरातील सर्व सरकारी, खाजगी दवाखाने, हॉस्पिटल्स, प्रयोगशाळा, डेंटल क्लिनिक्स, रक्तपेढया, पशुवैद्यकीय दवाखाने, तसेच तत्सम इतर सर्व प्रकारचे वैद्यकीय व्यावसायिकांना महापालिकेने, तुमचा  जैव वैद्यकीय कचरा निर्मूलन करण्यासाठी करारानुसार  नेचर इन नीड या ठेकेदाराची देयके अदा करण्यास सांगितले आहे . तसेच सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी  देयके नियमित देऊन ठेकेदाराकडून वार्षकि सभासद नोंदणीची प्रमाणपत्रे घेवून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व बॉम्बे नìसग होम  कार्यालयाकडे सात दिवसात हजर करण्याची सूचना केली आहे.  देयके अदा न करणारे व्यावसायिकांकडील जैव वैद्यकीय कचरा उठाव बंद करणार करण्यास प्रशासनाने ठेकेदारास कळवले आहे . जैव वैद्यकीय कचरा उठावाचे काम बंद झाल्यास त्यांच्या व्यवसायातून निर्माण होणाऱ्या  कचऱ्याच्या  विल्हेवाटीची जबाबदारी ही संबंधितांची राहील .  कोणत्याही  प्रकारचा जैव वैद्यकीय कचरा उघडयावर टाकल्याचे  निदर्शनास आल्यस  संबंधित भागातील वैद्यकीय व्यावसायिकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आज महापालिकेच्यावतीने देण्यात आला आहे.