महापौरांसह ६ नगरसेवकांची जात प्रमाणपत्रे अवैध

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अगोदरच काठावरचे बहुमत असताना कोल्हापूर महापालिकेतील सत्तारुढ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल ५ नगरसेवकांच्या पदावर गदा आल्याने त्याचा परिणाम पालिकेतील सत्तेवरही होण्याची शक्यता दिसत आहे. महापौरांसह एक सभापतीपदही घालवावे लागल्याने सत्तारुढ पक्ष अडचणीत आला असताना त्याचा फायदा विरोधातील भाजप-ताराराणी आघाडीकडून उठवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. महापौर निवडीचा कार्यक्रम लवकरच होणार असल्याचे आयुक्तांनी म्हटले असल्याने महापौर निवडीच्यावेळी पुन्हा एकदा सत्तासंघर्ष उफाळून येणार आहे. महापौर निवडीवेळी सत्तारुढ गटाकडे अवघी दोन-तीन मते जादा असली तरी ऐनवेळी काही सदस्यांना गरहजर ठेवून महापौरपद खेचून आणण्याचा भाजप-ताराराणी आघाडीचा प्रयत्न असणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीन महिन्यापूर्वी महापालिकेत चमत्कार पाहावयास मिळेल असे विधान केले होते. त्याचा प्रत्यय यानिमित्ताने येतो का हे पाहणे औत्सुक्याचे बनले आहे.

कोल्हापूर महापालिकेच्याा निवडणुकी सहा महिन्यापूर्वी काँग्रेस पक्षाला फारसे कोणी गांभीर्याने घेत नव्हते. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना हे चारही पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्याने निकालाचा नेमका अंदाजही येत नव्हता. अशा स्थितीत सतेज पाटील यांनी राजकीय चातुर्य पणाला लावून सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यचा पराक्रम केला. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी सत्तेचे साटेलोटे करुन महापालिकेतील सत्ता पदरात पाडून घेतली. पहिल्या महापौर पदासाठी अश्विनी रामाणे यांना संधी देण्यात आली. पण या आनंदाला आता गालबोट लागले आहे.

जातीचा दाखला विहित कालावधीत सादर न केल्याने सात नगरसेवकांना सदस्यत्वावर पाणी सोडावे लागले आहे. यामध्ये प्रामुख्याने महापौर रामाणे यांच्यासह काँग्रेसच्या चार तर राष्ट्रवादीच्या एक अशा पाच सदस्यांचा समावेश आहे. विरोधातील भाजप-ताराराणी आघाडीचा प्रत्येकी १ एक नगरसेवक आता घरी बसला आहे. यामुळे महापालिकेतील सत्ता समीकरण बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

महापालिकेच्या सभागृहातील सदस्यांची संख्या आता ७४ इतकी असून बहुमतासाठी ३८ सदस्यांची गरज आहे. सध्या काँग्रेस व त्यांना पाठिंबा देणाऱ्या एका अपक्षासह २५ सदस्य तर राष्ट्रवादीच्या १४ अशा ३९ जणांचा समावेश आहे. ताराराणी आघाडीचे १८, भाजप व अपक्ष यांचे १३ सदस्य आहेत. तर शिवसेनेचे ४ सदस्य आहेत. ही आकडेवारी पाहता महापौरपद निवडताना सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीची कसोटी लागणार आहे. सत्तेत येतानाच हा पक्ष काठावरचे बहुमत घेऊन आला होता. आतातर त्यांना बहुमत टिकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

काँग्रेसची सत्ता हिसकावून घेण्याचा प्रयत्न महापालिकेच्या निकालानंतर विरोधकांनी चालविला होता. पालकमंत्री पाटील हे तर सातत्याने आमचाच महापौर होणार, असा दावा करीत होते. काँग्रेसचा महापौर होऊन दोन महिने झाल्यानंतरही त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना पुन्हा एकदा आपलाच महापौर होईल असा सूर आळवला होता. तेव्हा त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात खिल्ली उडविली गेली. पण जातीच्या दाखल्याच्या प्रकरणावरुन तब्बल सात नगरसेवकांना पदावर पाणी सोडावे लागल्याने सत्तेचे चित्र बदलण्याची स्थिती निर्माण झाली असताना या परिस्थितीचा फायदा पालकमंत्री उठविण्याची शक्यता आहे. महापौर निवडीवेळी काही सदस्यांना गरहजर ठेवण्याची खेळी त्यांच्याकडून होण्याची चिन्हे आहेत.

मात्र विरोधकांचे मनसुबे यशस्वी होऊ द्यायचे नाहीत या निर्धाराने सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांचे प्रयत्न राहणार असले तरी त्यांना खूपच सावधगिरीने पुढची काटेरी वाटचाल करावी लागणार आहे.