कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शंभर कोटीची रस्ते कामे रखडल्यानंतर कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीने आंदोलन छेडल्यानंतर आता कोल्हापूर महापालिकेला जाग आली आहे. शहरातील केवळ पाच प्रमुख रस्ते ३० मे पूर्वी पूर्ण करावेत असे आदेश बुधवारी ठेकेदारास देण्यात आले आहेत.

शहरातील १६ मुख्य रस्ते करणे बाबत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) शासन निधीतून १०० कोटी निधी मधून रस्ते करण्यास मान्यता झालेली असून त्या अनुषंगाने सदर कामाची वर्क ऑर्डर ठेकेदार मे. एवरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर्स अँड डेव्हलपर्स सोलापूर यांचे नावे मंजूर झालेली आहे.

Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच

हेही वाचा : स्मार्ट मीटर्सचा स्मार्ट प्रोजेक्ट म्हणजे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे; प्रताप होगाडे यांचा आरोप

यंत्रणे अभावी कामे रखडली

सदरची वर्क ऑर्डर १४.१२.२०२३ रोजी ठेकेदारास लागू करण्या आलेली आहे. या १६ पैकी ५ रस्त्याची कामे १५ मे पूर्वी पूर्ण करण्याबाबत प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी ठेकेदाराला आदेश दिले होते. तथापी ठेकेदाराकडे उपलब्ध असलेले यांत्रिक बळ, मनुष्यबळ तसेच मटेरिअल पाहता त्याला दिलेल्या कालावधीमध्ये तो कामे पूर्ण करु शकलेला नाही. त्यामुळे संबधित ठेकेदाराला कोल्हापूर महानगरपालिकेकडून कामाची प्रगती वाढविण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

या कामांना गती

यानंतर संबधित ठेकेदाराने दि. ११.०५.२०२४ रोजी पासून योग्य ते मनुष्यबळ व यांत्रिक बळ आणून कामासाठी लागणारे मटेरिअल उपलब्ध करून पूर्ण क्षमतेने काम सुरु केले आहे. या ५ रस्त्यांपैकी निर्मिती कॉर्नर ते कळंबा रोड या ५९८ मी. लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरण काम पूर्ण झाले आहे. तसेच सद्यस्थितीत कोळेकर तिकटी ते नंगीवली चौक या ४०० मी. रस्त्याचे खडीकरण काम पूर्ण करून डांबरीकरण काम प्रगतीपथावर आहे. खरी कॉर्नर ते उभा मारुती चौक या रस्त्यांपैकी भाग निहाय रस्त्याचे खडीकरण केलेले आहे.

हेही वाचा : कोल्हापूर: चंद्राबाबू नायडू उद्या महालक्ष्मी, साईबाबाच्या चरणी

माऊली चौक ते हुतात्मा चौक ते विश्वजित हॉटेल लांबी १५०० मी. या रस्त्याचे युटीलिटी शिफ्टींग तसेच खडीकरण काम सुरू आहे. शहरातील मुख्य वर्दळीचा रस्ता दसरा चौक ते इंदिरा सागर हॉटेल प्रथम प्राधान्याने करण्याचे नियोजन संबधित ठेकेदारास देण्यात आले आहे. या ५ रस्त्याची कामे ३० मे पुर्वी खडीकरण व डांबरीकरण पूर्ण करण्याबाबत संबंधित ठेकेदाराला निर्देशित करण्यात आलेले आहे.

आणखी दोन वर्षांची प्रतीक्षा

कामाची मुदत ही १८ महिन्यांची आहे म्हणजे एकूण काम पूर्ण होण्यास कोल्हापूरकरांना आणखी दोन वर्षांची प्रतीक्षा करणे भाग आहे. दि.१३.०५.२०२५ रोजी कामे पूर्ण होणार आहेत. या कालावधीत संबंधित ठेकेदाराकडून सदर वर्क ऑर्डरमध्ये नमुद संपूर्ण १६ रस्त्यांची कामे पूर्ण करणे संबधित ठेकेदाराला बंधनकारक राहणार आहे. अन्यथा संबधित ठेकेदारावर टेंडर शर्तीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.