बिबट्याच्या हल्ल्यात दहा वर्षीय बालिकेचा बालिका ठार झाल्याची घटना शाहूवाडी तालुक्यात बुधवारी घडली. या निमित्ताने मानव – वन्य प्राणी संघर्ष संघर्षाच्या मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. उदगिरी पैकी केदारलिंग वाडी गावातील मनीषा डोईफोडे ही दहा वर्षाची आई सोबत जनावरांना चारण्यासाठी गेली होती. हा भाग काहीसा निर्मनुष्य व वनाच्छादित आहे. तेथे बिबट्याने मनीषावर हल्ला चढवला. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. तिची आई बचावली या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

वनविभागाची मदत

ही घटना घडल्यानंतर शाहुवाडीचे वनसंरक्षक अमित भोसले यांच्यासह पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयाकडे सोपवण्यात आला. दरम्यान वन्य प्राण्यांनी हल्ला केल्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने २० लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते. त्यापैकी दहा लाख रुपयांचा धनादेश तात्काळ दिला जातो. तर पाच वर्षाच्या मुदतीने आणि दहा वर्षाच्या मदतीने अशा दोन पाच लाखाच्या ठेवी कुटुंबीयांच्या नावाने ठेवल्या जातात. याप्रमाणे डोईफोडे परिवाराला मदत केली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader