कोल्हापूर : समाजात लोकांच्या मेंदूला भूल दिली गेली आहे. भारतीयत्व, संस्कृती, मूल्य आपण विसरून गेलो आहोत. अशा स्थितीत समाजाला जागे करण्याचे काम साहित्यिकांनी केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षा लेखक प्रवीण बांदेकर यांनी रविवारी केले. निमशिरगाव येथे महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व साहित्य सुधा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २७ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. साहित्य संमेलने लोकांमध्ये सामाजिक भान निर्माण करण्याचे, माणसा माणसांमधील संवाद वाढीस लावण्याचे, चिकित्सा, विचारांचे मंथन करण्यास चालना देतात. त्यातून नवीन लेखक, विचारवंत, वाचक निर्माण होतात, असेही ते म्हणाले. डॉ. अतिका पटेल, डॉ. अजित बिरनाळे, डॉ. धवल पाटील, यांच्या उपस्थित ग्रंथदिंडी सभामंडपात दाखल झाली. पी. बी.पाटील सहित्यनगरीत प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा