कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव, सुपुत्र उद्योजक सत्यजित जाधव यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना पक्षाचे उपनेतेपद देण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांनी ऐन दिवाळीत काँग्रेसला धक्का दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव या २०१९ साली काँग्रेसकडून विजयी झाल्या होत्या. या वेळी त्या इच्छुक असताना आधी राजेश लाटकर आणि नंतर मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे नाराज झालेल्या जाधव यांनी हाती धनुष्यबाण घेतले. निष्ठेने पक्षाने दिलेले काम करूनही सरळ सरळ उमेदवारी देताना अन्याय झाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यात खदखद होती. त्यातूनच समर्थकांच्या आग्रहामुळे आमदार जाधव यांनी शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय घेतला. आमदार जाधव या कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे महिला संघटन अधिक बळकट करतील. महायुती सरकारने महिलांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या विविध योजनांचा प्रसार व प्रचार करतील. त्याचा कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाला उपयोग होईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला.

हेही वाचा :कोल्हापूर: राजू शेट्टी यांनी चळवळीचा बाजार मांडला, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांची टीका

निवडणुकीवर परिणाम

काँग्रेसच्या विद्यमान आमदाराने शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्ह्यातील हा काँग्रेसला मोठा धक्का आहे. त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटतील, असा अंदाज आहे. या वेळी खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार राजेश क्षीरसागर उपस्थित होते.