कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असल्याचे शुक्रवारी सांगण्यात आले. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस लागू केलेले अधिकारी समितीत असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आग महापालिकेच्या वास्तूला आणि चौकशीही महापालिकेचेच अधिकारी करणार असल्याने वास्तव समोर येणार का, यावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.

काल रात्री आग लागल्यावर महापालिका, विमानतळ प्राधिकरण, एमआयडीसी, इचलकरंजी, सांगली, वारणा, हुपरी, हातकणंगले, गडहिंग्लज व पन्हाळा या नगरपालिकांचे अग्निशमन वाहनाद्वारे आग विझविण्यात आली.

Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Eknath Shinde, Eknath Shinde comment on Mahavikas Aghadi, Mehkar,
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “धनुष्य चोरायला ते काही खेळणं आहे का? लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये…”
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा

हेही वाचा : के. भो. नाट्यगृहाच्या पुनर्उभारणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मदत – हसन मुश्रीफ

आज प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी या आगीची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती तातडीने गठीत केली आहे. त्यामध्ये अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांचा समावेश आहे. नाट्यगृहाचा विमा उतरला असून साडेसात कोटींची नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा केला जाणार आहे. महापालिकेने यावर्षीही फायर ऑडिट केले असल्याचा दावा करण्यात आला. विशेष म्हणजे यातील बऱ्याच अधिकाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल अलीकडेच कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

हेही वाचा : Keshavrao Bhosale Theater Fire : केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीमुळे कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची प्रशासनाला भीती

महावितरणने हात झटकले

केशवराव भोसले नाट्यगृहास वीज पुरवठा करणारी महावितरणची यंत्रणा या इमारतीपासून दूर मोकळ्या जागेत आहे. महावितरणची जबाबदारी ही मीटरींग युनिट पर्यंत असते. तेथून पुढे सर्व जबाबदारी ही संबंधित ग्राहकाची असते. नाट्यगृहातील अंतर्गत वीज वितरण व्यवस्था ही महानगरपालिकेची असल्याने आगीच्या घटनेशी महावितरणचा कोणताही संबंध नसल्याचे सूत्रांनी सांगितले.