कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये लागोपाठ येत असलेल्या महापुरावर शासनाने कायमस्वरुपी उपाय शोधावा. तसेच या भागाला पूर मुक्ती द्यावी या एकमात्र उद्देशासाठी पूर परिषदेचे आयोजन केले आहे. या पूर परिषदेला पूरबाधितांसह सर्वसामान्य जनतेने मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन आंदोलन अंकुश या शेतकरी संघटनेचे नेते धनाजी चुडमुंगे अकिवाटमध्ये झालेल्या सभेत केले. सभेच्या अध्यक्षस्थानी बाळू मामा उमाजे होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संत रोहिदास समाज मंदिरात झालेल्या सभेत धनाजी चुडमुंगे पुढे म्हणाले की जगभरात प्रत्येक आपत्तीवर तेथील सरकारने उत्तर शोधले आहे अगदी अलीकडच्या काळात २००५ ला मुंबईमध्ये पण पूर आपत्ती आली होती. त्यावर सरकारने उत्तर शोधून काढले आणि मुबंईला पूर मुक्त केले. तसे आपल्या भागात पण वारंवार येणाऱ्या महापुरावर सरकार का उत्तर शोधत नाही? म्हणून आम्ही पूर परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी सरकारला जागं करत असतो. नृसिंहवाडी येथे रविवारी १६ जून रोजी दुपारी २ वाजता होणाऱ्या पूर परिषदेला आपण सर्वांनी यावे, आणि आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवावा म्हणून मोठ्या संख्येने या, अशी विनंती त्यांनी शेवटी केली. या सभेला कृष्णा गावडे, दिपक पाटील, हलिंगळे व बाळसिंग रजपूत यांनीही मार्गदर्शन केले. आभार कुमार तवंदकर यांनी मानले.

हेही वाचा – कोल्हापूर : बेलेवाडी काळमाच्या वृद्ध शेतकऱ्यांच्या उपोषणाची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सरबत घेऊन सांगता

हेही वाचा – संजय मंडलिक यांच्या पराभवाला हसन मुश्रीफ जबाबदार? भाजपच्या निष्कर्षाने कोल्हापुरात महायुतीत वादाची ठिणगी

संघटना लहान असली तरी काम मोठं आहे

आंदोलन अंकुश काय पूर रोखणार असा प्रश्न लोकांना पडणे स्वाभाविक आहे. पण याच संघटनेने गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा करून महापुराची कारणे शोधण्यासाठी सरकारने नेमलेल्या वडनेरे समितीने आपल्या अहवालात आलमट्टीला क्लीन चिट दिली होती. नंतर त्याच वडनेरे यांनी आलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरचा नव्याने अभ्यास करण्याची गरज असल्याचे पत्र शासनाला दिले. शासनानेही तात्काळ याचा अभ्यास करण्यासाठी रुरकी या तांत्रिक संस्थेची याकामी नेमणूक केली आहे. वडनेरे समितीला आपलं अहवालातील मत बदलायला भाग पाडणारी ही संघटना लहान असली तरी काम मोठं करते हे लक्षात घेऊन आमच्या पूर मुक्तीच्या लढ्याला साथ द्यावी, असं आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी यावेळी उपस्थित लोकांना केले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur organized flood council for flood relief government should find a permanent solution to flood dhanaji chudmunge ssb
Show comments