कोल्हापूर: प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त येथील पंचगंगा घाट हजारो दिव्यांनी प्रकाशमान झाला. दीपोत्सवाने पंचगंगेला चढलेला साज पाहण्यासाठी करवीरकरांनी एकच गर्दी केली होती. पंचगंगा नदी घाट आणि दीपोत्सव हे अनोखं नातं आता घट्ट झाले आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव साजरा करण्यासाठी गेले दोन दिवस आधी तयारी सुरू होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – राजू शेट्टी यांचा एकाचवेळी अनेकांशी सामना

हेही वाचा – पंचगंगा कारखान्याचा सर्वाधिक प्रति टन ३३०० रुपये दर जाहीर, शेतकऱ्यांकडून समाधान

पहाटेपासून पंचगंगा नदी परिसरात लगबग सुरू होती. कार्यकर्त्यांनी पंचगंगा घाट, मंदिरे, समाधी मंदिरात पणत्या लावल्या होत्या. विविध मंडळाचे कार्यकर्ते,कलाकार, महाविद्यालयीन युवतींच्या जादूई बोटातून रांगोळी साकारली जात होती. पहाटे साडेतीन वाजता पंचगंगा नदी परिसर रांगोळ्यांनी नटला होता. परिसरात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. सांस्कृतिक दीपोत्सवही साजरा झाला. स्थानिक कलाकारांच्या भाव​गीत व भक्तीगीतांची सुरेल साथ मिळाली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur panchganga ghat illuminated with thousands of lamps ssb
Show comments