कोल्हापूर : इचलकरंजी परिसरात गुन्हेगारी कृत्याने धुमाकूळ घालणाऱ्या जर्मनी टोळी विरोधात मोक्का कारवाई करण्याचा आदेश रविवारी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर,इचलकरंजी शहरासह जिल्ह्यात अवैध व्यवसायामध्ये सक्रिय संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत प्रभावी कारवाई करणेबाबत जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १८ ऑगस्ट २०२३ रोजी एक गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा…के. पी. पाटील यांनी आव्हान स्वीकारले; बिद्री साखर कारखान्याच्या लेखापरीक्षण आदेशाचे स्वागतच

फिर्यादी उमेश मदन म्हात्रे यांच्या पवन हॉटेलमध्ये जर्मनी टोळीतील बजरंग फातले, अमर शिंगे, शुभम पट्टणकुडे, श्री लोखंडे व अनोळखी दोघांनी फिर्यादी व त्यांच्या मुलास शिवीगाळ, धक्काबुक्की करून ड्रॉवर मधील ७ हजार रुपये बळजबरीने काढुन घेतले होते.

कोल्हापूर व इचलकरंजी शहरासह जिल्हा परिसरातील शरीराविरूद्धच्या व मालाविरुध्दच्या गुन्ह्यांसह अवैध व्यवसायामध्ये सक्रिय असलेल्या संघटित गुन्हेगारी टोळ्या तसेच समाजकंटक इसमांच्या वाढत्या गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत करुन सराईत गुन्हेगार, टोळीची दहशत निर्माण करुन आर्थिक लाभासह इतर लाभ संपादन करणेसाठी गुन्हे करणाऱ्या गुन्हेगार व टोळ्यांविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत प्रभावी कारवाई करणेबाबत जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांना सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा…कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपले; काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस

गुन्ह्याच्या तपासामध्ये जर्मनी टोळीचा कुख्यात संघटित गुन्हेगारी संघटनेचा १) आनंदा शेखर जाधव उर्फ जर्मनी, रा. सरकारी दवाखान्याजवळ, कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, याचा तसेच व टोळीतील २) अविनाश शेखर जाधव उर्फ जर्मनी, रा. सरकारी दवाखान्याजवळ, कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, ३) बजरंग अरुण फातले, रा. दत्त मंदीर शेजारी, शास्त्री सोसायटी, लिगाडे मळा, जवाहरनगर, इचलकरंजी, ता. हातकणंगले, ४) शुभम सदाशिव पट्टणकुडे, रा. लक्ष्मीमाळ, रुई रोड, कबनूर, ता. हातकणंगले, ५) अमृत उर्फ अमर नारायण शिंगे, रा. सहारानगर, गल्ली नं. ७, रुई, ता. हातकणंगले, ६) शोहेब मेहबुब पठाण, रा. अक्सा मश्जीदजवळ, लिगाडे मळा, इचलकरंजी, ता. हातकणंगले, ७) विवेक उर्फ श्री विश्वास लोखंडे, रा. साई मंदीराजवळ, स्वामी मळा, इचलकरंजी, ता. हातकणंगले यांचा सहभाग निष्पन्न झाला. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी केला.

हेही वाचा…कोल्हापूर: लहान मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न; दोघां भिक्षेकऱ्यांना जमावाकडून चोप

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने सन २०२२ पासून आज अखेर ५ प्रस्तावांमध्ये ५६ आरोपींचेविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.३ प्रस्ताव अंतिम निर्णयावर आहेत.