कोल्हापूर : एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या रविवारी होत असताना कोल्हापुरात क्रिकेटचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. आवडत्या क्रिकेटपटुंचे मोठे मोठे फलक लावण्यात आले आहेत. कोल्हापूर हे क्रीडाप्रेमींचे शहर म्हणून ओळखले जाते. कुस्ती, फुटबॉल, क्रिकेट यांसह सर्व प्रकारच्या खेळांचे दर्दी आणि खेळाडू हे घरोघरी आढळतात. अंतिम सामना यजमान भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होत असताना कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह आवडत्या खेळाडूंचे मोठमोठे फलक शहरात लावण्यात आले आहेत. उद्या कोल्हापूरकरांचे सगळे लक्ष सामन्याकडे असेल, असे कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनचे सचिव केदार घायवळ यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरचा “लेझर शो” झळाळणार

पैजा, बेटिंग तेजीत

भारतीय संघाने विजय मिळवावा अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत. त्यासाठी मोठ्या पैजा लागल्या आहेत. तर कोणता संघ जिंकणार यासाठी बेटिंग तेजीत असून खिशाला कात्री लावण्याचे कामही सुरु असून भारतीय संघ जिंकण्याकडे कल दिसत आहे.

हेही वाचा : पुन्हा खासदार होण्यासाठी शेट्टी कारखानदारांना लक्ष्य करून पोळी भाजत आहेत – रामचंद्र डांगे

निळाईची झाक

भारतीय क्रिकेट संघाचा गणवेश असलेल्या निळ्या जर्सीचा दरही वधारला आहे. २०० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंतची जर्सी घेण्यासाठी तरुणाईची गर्दी होत आहे. अनेक क्रिकेट संघ, तालीम संघ, तरुण मंडळ यांनी अंतिम सामना प्रोजेक्टरद्वारे मोठ्या पडद्यावर एकत्रित पाहण्याची जय्यत तयारी केली आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur preparations for icc world cup final match india vs australia css