कोल्हापूर : कोल्हापुरातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाजीराव खाडे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी ही कारवाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अपयशाचा अंदाज आल्याने मोदींची जीभ घसरतेय – पृथ्वीराज चव्हाण

हेही वाचा – “..तर देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकांची ठरली असती”; पृथ्वीराज चव्हाणांचे पंतप्रधानांवर टीकास्र

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव खाडे प्रयत्नशील होते. ती न मिळाल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. खाडे यांनी माघार घेण्यासाठी मनधरणी सुरु होती. त्यास दाद न देता त्यांनी बंडखोरी केली. परिणामी पक्षाने कारवाईचे पाऊल उचलले आहे. गेल्या २८ वर्षांपासून काँग्रेसचे काम करणारे खाडे हे राहुल गांधी, प्रियांका गांधी यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात. त्यांनाच आता पक्षाने हात दाखवला आहे.