कोल्हापूर : महापुराच्या पाण्यात वाहून गेलेले शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इकबाल बैरागदार यांच्या मृतदेहाचे अवशेष अखेर चार महिन्यांनंतर कर्नाटकात आढळून आले. शिरोळ तालुक्यात ऑगस्ट महिन्यात महापूर आला होता. दोन तारखेला अकिवाट (ता. शिरोळ) येथे कृष्णा नदीत ट्रॅक्टर पलटी होऊन इकबाल बैरागदार यांच्यासह आठ जण पाण्यात वाहून गेले होते. सहा जण सुखरूप बाजूला आले. पण त्यातील सरपंच पती सुहास शामगोंडा पाटील आणि अण्णासाहेब हसुरे यांचा मृत्यू झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : कर्नाटकच्या कृष्णाकाठ योजनेमुळे पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका

त्यांचा मृतदेह शोधपथकास सापडला. मात्र, बैरागदार हे नदीतून वाहून गेल्याने शोध लागला नव्हता. आज कर्नाटकातील देसाई इंगळी गावच्या नदीकाठच्या शेतात ऊसतोड सुरू असताना बैरागदार यांचे मानवी अवशेष आढळून आले. अवशेषाजवळ सापडलेले मोबाईल आणि कपडे यावरून बैरागदार यांची ओळख पटली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur remains of body a person who drowned in flood found after four months in karnataka s village css