कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांपासून अधिक काळ पोलिसांना गुंगारा देणारा मटका किंग सम्राट कोराणे हा न्यायालयात स्वतःहून शरण आल्यानंतर त्याची कळंबा कारागृहात रवानगी केली होती. तेथून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सम्राट कोराणे याच्यावर पाच वर्षांपूर्वी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. कोराणे हा स्वतःहून सत्र न्यायालयात शरण आला होता. त्याची कळंबा कारागृहात रवानगी केली होती. कोल्हापूर पोलिसांनी कोराणे याचा ताबा मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता.
त्यानुसार न्यायालयाने त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना परवानगी दिली होती. त्यानुसार आज त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी कळंबा कारागृह बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. कोराणे याला मोक्का न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.