कोल्हापूर : उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर, दख्खनचा राजा जोतिबा मंदिर येथे रविवारी भाविकांनी गर्दी केली. पर्यटकांच्या उपस्थितीमुळे कोल्हापूर फुलून गेले असून महालक्ष्मीचा दर्शनासाठी लाखावर भाविक जमले होते. उन्हाचा मारा सह्य झाल्याने राबता वाढला आहे.
दरवर्षी उन्हाळा सुट्टीत कोल्हापूरला येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी आते. यावर्षी लोकसभा निवडणुकीचे मतदान राज्यात वेगवेगळ्या टप्प्यात झाले. यामध्ये नागरिक तसेच शासकीय यंत्रणा गुंतून राहिली होती. मतदान पार पडल्यानंतर अनेकजण सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडले आहेत.
हेही वाचा…कोल्हापूर : कळंबा कारागृहात बेबंदशाही; मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा निर्घृण खून
हजारो भाविक कोल्हापूर, ज्योतिबा येथे उपस्थिती लावून देवदर्शनाचा लाभ घेत आहेत. पुणे-मुंबई आणि इतर मोठ्या शहरातून भाविक कोल्हापूरमध्ये दाखल होत आहेत. महालक्ष्मी मंदिरात दर्शन मंडप उभारण्यात आला आहे. पायालाच चटके बसून आहेत यासाठी अधून मधून पाणी फवारणी केली जात आहे. रविवारी लाखभर भाविकांनी दर्शन घेतले असल्याची माहिती देवस्थान समितीने दिली.
© The Indian Express (P) Ltd