कोल्हापूर : Swapnil Kusale won Bronze in Olympic 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदक जिंकले. त्याच्या या कामगिरीने करवीरनगरीला प्रथमच ऑलिम्पिकमध्ये यश मिळाले.  स्वप्नीलने नववीत असताना पाहिलेले ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न आज १५ वर्षांनंतर साकार झाल्याने त्याच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहिले.

हेही वाचा >>> Swapnil Kusale : मराठमोळ्या स्वप्नील कुसळेने रचला इतिहास; ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पटकावलं कांस्य

Sexual assault journalist Kalyan,
कल्याणमध्ये महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार
Check the List of Highest-Selling Cars of the Year
‘या’ सात सीटर कारला लोकांची सर्वात जास्त पसंती,…
keshavrao bhosale theater reconstruction marathi news
केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी कागदावर! निधीच्या केवळ घोषणाच, चौकशी समितीकडून यंत्रणाही दोषमुक्त
Ajit Pawar, Ajit Pawar Ganapati Darshan Pune,
पुण्यात अजित पवारांसमोरच वाजली तुतारी…
actress suruchi adarkar express her feeling about her husbond piyush ranade on occasion of ganesh festival
लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सावानिमित्ताने अभिनेत्री सुरुची अडारकरने शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, “बाप्पा, तुझ्या येण्याने… “
girl molested in kolkata
राज्यात महिला अत्याचारविरोधी कायदा पारित होत असतानाच कोलकात्यात महिलेचा विनयभंग; दोघांना अटक
man meet on social media raped girl in pune
पुणे : समाज माध्यमातून झालेल्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार
Reclaim the night womens in kolkat took out these night marches
स्री-‘वि’श्व: ‘रिक्लेम द नाइट’

कोल्हापूरला नेमबाजांची मोठी परंपरा आहे. तेजस्विनी सावंत, राही सरनोबत यांनी या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्याच्या पुढचे पाऊल आज स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलम्पिकमध्ये टाकले. स्वप्नीलने पात्रता फेरीमध्ये ५९० गुणांसह काल सातवे स्थान मिळवले होते. तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. पुण्यातील बालेवाडीतील क्रीडा प्रबोधिनीमध्ये नेमबाजीचा सराव करणाऱ्या या कोल्हापूरच्या पठ्ठ्याने आज अंतिम फेरीत आपली कामगिरी आणखी उंचावली.

स्वप्नील कुसाळे ऑलम्पिक स्पर्धेत पदक मिळवणार याचा विश्वास कोल्हापूरकरांना वाटत होता. अंतिम फेरीत स्थान मिळवल्यानंतर तो सुवर्णपदकाला गवसणी घालेल, असा विश्वास शिक्षक असलेले त्याचे वडील सुरेश कुसाळे आणि सरपंच असलेली आई अनिता कुसाळे यांनी व्यक्त केला होता.

हेही वाचा >>> Swapnil Kusale : मराठमोळ्या स्वप्नील कुसळेने रचला इतिहास; ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पटकावलं कांस्य

स्वप्नील सध्या भारतीय रेल्वेमध्ये टीसी म्हणून कार्यरत आहे. राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी हे गाव सन २०१२ मध्ये राज्यस्तरीय स्वच्छता अभियानामध्ये प्रथम आले होते. यानंतर आता स्वप्नील कुसाळेच्या पराक्रमामुळे कांबळवाडीचा डंका जगभर पोहचला आहे. नेमबाजी हा आर्थिकदृष्ट्या अत्यंत महागडा खेळ आहे. तरीही स्वप्नीलने या क्षेत्रात नाव कमवावे यासाठी वडिलांनी त्याला सातत्याने पाठबळ दिले होते. सुरुवातीच्या काळात गोळ्या घेण्यासाठीही अडचणी येत होत्या. मात्र, स्वप्नीलची राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी सुधारत गेली, तसतसे त्याला कुटुंबीयांनी सर्वतोपरी मदत केली. कुटुंबीयांच्या पाठबळामुळे स्वप्नीलने पॅरिसमध्ये भारताचा तिरंगा फडकवला आहे.