कोल्हापूर : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्यात राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरा प्रकल्प किणी (ता. हातकणंगले) येथे कार्यान्वित झाला. या प्रकल्पातून १२१६ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होऊ लागला आहे. या पूर्वी पहिला प्रकल्प हरोली (ता. शिरोळ) येथे कार्यान्वित झाल्याने जिल्ह्यात शेतीला दिवसा वीजपुरवठा मिळणाऱ्या शेतकऱ्यांची एकूण संख्या २००६ झाली आहे.

हेही वाचा : कोल्हापूर : पुरात वाहून गेलेल्या मृतदेहाचे अवशेष चार महिन्यांनंतर आढळले

कोल्हापूर जिल्ह्यात ५३ ठिकाणी सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यांची स्थापित क्षमता १७० मेगावॉट आहे. अनेक प्रकल्प प्रगतिपथावर असून, ते पूर्ण झाल्यानंतर ४८ कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे. कमी दाबाच्या तक्रारीदेखील दूर होऊन स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीस चालना मिळणार आहे. सौर प्रकल्प उभारण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत, स्थानिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. या प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे व त्यांच्या प्रशासकीय पथकाचे, तर गायरान जमिनी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद व भूमी अभिलेख कार्यालय यांचे सहकार्य लाभले आहे.

Story img Loader