कोल्हापूर : गव्याने धडक दिल्याने मोटरीतून प्रवास करणारे तिघेजण जखमी झाले. ही घटना राधानगरी जवळ सोमवारी घडली आहे. यामध्ये निलेश अर्जुन मर्गज (रा. सिंधुदुर्ग), आकाश महेश पाटील, महेश श्रीकांत पाटील (दोघे रा. कोल्हापूर) असे तिघेजण जखमी झाले असून मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे.

निलेश, महेश, आकाश हे तिघेजण मोटारीने कोकणात निघाले होते. निपाणी – देवगड राज्य मार्गावर राधानगरी जवळून ते जात होते. हा भाग घनदाट जंगलाचा असून राधानगरी हे गव्याचे अभयारण्य म्हणून ओळखले जाते. सांगावकर मळ्यासमोरून ते जात असताना बिथरलेल्या गव्याने अचानकपणे मोटारीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये तिघेही जखमी झाले. तसेच मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे.

FASTAG, road tax Mumbai, traffic jam Mumbai,
दुसऱ्या दिवशीही पथकराचा गोंधळ कायम, फास्टॅगमधून पैसे कापल्याचे संदेश, मार्गिकांच्या गोंधळामुळे वाहतूक कोंडी
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
thieves stole cash and liquor bottles worth rs 40920 from liquor shop in kondhwa area
आंबा बर्फी, सुकामेव्यानंतर आता मद्याच्या बाटल्या लंपास – कोंढवा परिसरातील मद्यालयात चोरी
child died in a leopard attack in Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू
Recently trader selling scrap was robbed at gunpoint in Baramatis Lokhande Vasti area
बारामतीत पिस्तुलाच्या धाकाने व्यापाऱ्याची लूट, ग्रामीण पोलिसांकडून तिघे गजाआड
news of goods train falling off on railway track came out on friday to see readiness of system in nandurbar
नंदुरबार : मालगाडी घसरल्याची बातमी अन…
Wardha dead bodies reservoir, Wardha,
वर्धा : जलाशयात आढळले तीन मृतदेह, दोघांची ओळख पटली; पूरबळी संख्या सात
st bus maharashtra, buses, ST, ST corporation,
आनंदवार्ता… ‘एसटी’च्या ताफ्यात आणखी २,५०० बसगाड्या येणार

हेही वाचा – कोल्हापूरात मद्यपी मित्राकडून मित्राचा गळा दाबून खून

हेही वाचा – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करण्यासाठी निर्भय पदभ्रमंती

वनपाल सूर्यकांत गुरव यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींना राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. गवा हल्ल्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने याबाबत उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.