कोल्हापूर : गगन बावडा तालुक्यात ‘ऱ्हॅब्डोप्स अक्वॅटिका’ व त्रावणकोर कवड्या’ अशा दोन दुर्मिळ सापांचा आढळ झाला आहे. अशी माहिती सर्प अभ्यासक डॉ. अमित पाटील यांनी शुक्रवारी दिली. पश्चिम घाटात सरिसृपांच्या सुमारे १५६ प्रजातींपैकी ९७ प्रजाती या स्थानिक प्रजाती असून त्यापैकी ५ प्रजाती संकटग्रस्त मानल्या जातात. हा परिसर सापांचे आगर मानला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गगनबावडा ग्रामीण रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. अमित तुकाराम पाटील व त्यांचे सहकारी तेजस पाटील यांना या भागात पाण्यात एक साप दिसला. त्यांना प्रथमतः तो पाणदिवड (स्थानिक भाषेत विरोळा/ इरोळा) असेल असे वाटले. जवळून निरीक्षण केल्यावर तो वेगळा साप असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पाणदिवड सापाच्या आक्रमक स्वभावाच्या विपरीत हा साप अतिशय शांत स्वभावाचा व अनाक्रमक दिसून आला. त्यांनी ही माहिती विख्यात सरिसृपतज्ज्ञ वरद गिरी यांना पाठविले असता, त्यांनी या सापाचे नाव ‘ऱ्हॅब्डोप्स अक्वॅटिका’ असल्याचे सांगितले. या सापाचा शोध अगदी अलीकडेच म्हणजे २०१७ साली लागला आहे. याचे अद्याप मराठीमध्ये नामकरण झालेले नाही. या सापाचा पाठीकडील रंग गडद शेवाळी तपकिरी, तर पोटाचा रंग फिकट पिवळसर असतो. मासे हे त्याचे मुख्य खाद्य आहे.

हेही वाचा – विशाळगड अतिक्रमण प्रश्नी संभाजीराजेंचा राजकीय हेतू कोणता? कोल्हापुरात सकल हिंदू समाजाची विचारणा

हेही वाचा – लाडकी बहीण योजनेसाठी शिवसेनेचे कोल्हापुरात ५० शिबिरांचे आयोजन

याशिवाय, डॉ. पाटील यांना करूळ घाट परिसरात ‘कवड्या’ सापांपैकी दुर्मिळ प्रजाती असणाऱ्या ‘त्रावणकोर कवड्या सापा’चेही अस्तित्व आढळून आले आहे. कवड्या हा बिनविषारी साप असून भिंतींवर किंवा उंचावर चढण्याचे विशेष कसब त्याच्या अंगी असते. तो शक्यतो पश्चिम घाटांच्या दक्षिण भागात (दक्षिणेकडील राज्ये) आढळतो.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur two rare snakes were found in gaganbawda area ssb
Show comments