कोल्हापूर : क्रिकेटच्या ध्यासातून तिघा तरुणांनी ग्रामीण भागात लेदर बॉलचे क्रिकेटचे सुसज्ज क्रिकेट मैदान अल्पकाळात साकारले आहे. शहर आणि ग्रामीण भागातील उदयोन्मुख क्रिकेट खेळाडूंसाठी कोरोची (ता. हातकणंगले) या दुष्काळी भागातील हे मैदान म्हणजे अत्यंत चांगली संधी देणारे ठरत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारतीय जनमानस आणि क्रिकेट यांचे नाते तसे जिव्हाळ्याचे. देश-विदेशात कोठेही क्रिकेट सामना असला तरी त्याकडे भारतीयांचे डोळे – कान लागलेले असतात. अगदी ग्रामीण भागातही खेळ हा रुजला आहे. इचलकरंजी महापालिकेने तर केवळ लेदर बॉल क्रिकेटसाठी भव्य राजाराम स्टेडियम उभारले आहे. या हिरवळीवर अनेक खेळाडू तयार झाले पण सध्या या मैदानाची दुरवस्था झाली आहे. परंतु त्यांना आवश्यक ते पाठबळ व सरावासाठी जागा उपलब्ध नसल्याने या क्रिकेटपटूंच्या खेळाला मर्यादा पडत आहेत. इचलकरंजीत आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकांना कोल्हापूर, पुणे अथवा मुंबई येथे प्रशिक्षणासाठी जावे लागते.
लाखमोलाचे योगदान
परिणामी येथे खेळणाऱ्या क्रिकेट खेळाडूंसाठी चांगले मैदान असावे असे स्वप्न घेऊन हरिष खंडेलवाल, भरत पाटील व युवराज यवलुसकर यांनी एकत्र येऊन कोरोची येथील उजाड माळावर सुमारे ८० लाख रुपये खर्च करून पाच एकर जागेत नवोदीत क्रिकेटपटूंसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. अवघ्या तीन महिन्यांत येथे मुख्य मैदानाची तसेच चार जाळीतील सराव मैदानाची उत्साहवर्धक हिरवळ फुलली आहे. हे तिघे मागील ११ वर्षांपासून सहारा क्रिकेट अॅकॅडमी क्रिकेटपटूंसाठी प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. आता अत्याधुनिक सुविधांसह क्रिकेटपटूंना योग्य ते मार्गदर्शन केले जाणार आहे. येथे ७ फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, आहारतज्ञ आदी वेगवेगळ्या विभागाचे प्रशिक्षक असून क्रिकेटचे मैदान गाजवलेले आनंदा दोपारे हे निशुल्क सेवाभावी मुख्य प्रशिक्षणाची जबाबदारी निभावणार असल्याचे संयोजकांनी गुरुवारी सांगितले.
हेही वाचा – कोल्हापूर जिल्ह्यातील गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी मरीआईचा गाडा ओढण्याच्या प्रथेचे पालन
अद्यावत सुविधा
आजवर येथील अनेक खेळाडू राज्यसंघात खेळले असून त्यांनी देशासाठी खेळावे त्यादृष्टीने चॅम्पियन्स सहारा क्रिकेट अॅकॅडमीच्या माध्यमातून मार्गदर्शनासह तयारी करुन घेतली जाणार आहे. मुला-मुलींसाठी स्वतंत्र ड्रेसिंग रुम, स्वच्छतागृह, व्यायामशाळा, वाहन व्यवस्था आदींची सोय आहे.या अकामदीचा जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन अकादमीच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९९२१३३५०५५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.