कोल्हापूर : अन्न पदार्थाच्या नमुण्याबाबत कारवाई करू नये यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागातील महिला अधिकाऱ्यास शुक्रवारी लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले. अन्नसुरक्षा अधिकारी किर्ती धनाजी देशमुख ( रा. विश्व रेसीडेन्सी, ताराबाई पार्क मूळ मोहोळ, सोलापूर ) असे कारवाई झालेल्या महिलेचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – मोदींची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करणार; समाजवादी पक्षाचा निर्णय

हेही वाचा – शिल्लक बी हेवी मळी पासून इथेनॉल निर्मितीस परवानगी; साखर उद्योगाला मोठा दिलासा

यातील तक्रारदार यांचे किणी,ता. हातकणंगले येथे मे .सम्राट फुडस नावाचे रेस्टाॅरंट आहे. १५ मार्च रोजी अन्न सुरक्षा अधिकारी किर्ती देशमुख यांनी सम्राट रेस्टोरेंटवर तपासणी करून अन्न पदार्थांचे नमुने घेतले. त्यामध्ये दोष आढळले होते. या प्रकरणी कारवाई न करण्यासाठी देशमुख हिने तक्रारदार यांच्याकडे १ लाख रुपये मागणी केली. तडजोडीअंती ७० हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हफ्ता २५ हजार रुपये लाच रक्कम त्यांच्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये स्वतः स्वीकारत असताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या विरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांनी सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur woman food security officer caught while accepting bribe ssb