कोल्हापूर : ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत, अशी माहिती अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य जी. पी. माळी, सचिव विश्वास सुतार यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिली.
लवटे सरांच्या सामाजिक, वाङ्मयीन, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याचा विचार करता त्यांचे अमृत महोत्सवी वर्ष वैचारिक मंथन आणि विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा…महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या संचालक मंडळात कोल्हापुरातून ७ जण बिनविरोध
प्राचार्य माळी म्हणाले, लवटे सरांच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर व्याख्यान , परिसंवाद , ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ प्रकाशन स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत पहिला कार्यक्रम रविवार, २३ जून रोजीए मकेसीएल फाउंडेशनचे मुख्य डॉ. विवेक सावंत यांचे कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षितिजे व मानव या विषयावर राम गणेश गडकरी सभागृह येथे सायंकाळी व्याख्यान होणार आहे.