कोल्हापूर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा लक्षवेधी अंतिम सामना उद्या रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघात जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियम अहमदाबादेत होणार असताना कोल्हापूरच्या तरुणांनी बनवलेला लेझर शो व लाईट इफेक्ट हे सामन्यांचे खास आकर्षण असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ चौथ्यांदा अंतिम सामन्यात जेतेपद मिळवण्यासाठी पोहोचला आहे, देशभरात या सामन्यासाठी आकर्षण वाढले आहे, सामन्यावेळी प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी मैदानावर खास लेसर शो व लाईट इफेक्ट करण्यात येतात. कोल्हापूर येथील अमित पाटील आणि रामकृष्ण वागराळे यांनी २०११ मध्ये लाईटच्या व्यवसायाला प्रारंभ केलेल्या जोडीने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला.

हेही वाचा : पुन्हा खासदार होण्यासाठी शेट्टी कारखानदारांना लक्ष्य करून पोळी भाजत आहेत – रामचंद्र डांगे

प्रकाशमान कीर्ती

हे दोघे अंतिम सामन्याच्या दुसऱ्या टप्प्यात अंधार पडल्यानंतर नेत्रदीपक विद्युत रोषणाई डिम शो व ग्राफिक शोच्या माध्यमातून कला सादर करणार आहेत. त्यांचे सध्या अहमदाबाद येथील मैदानात दिल्ली येथील हेड वे क्रिएशन या कंपनीसोबत शो सादर करण्याचे प्रात्यक्षिक सुरु आहे. यासाठी ६० वॅट या क्षमतेचे ४० लेसर लावण्यात येणार असून हा एक विक्रम आहे. यापूर्वी कधीही एका वेळेला मैदानावर ४० लेसर कार्यान्वित केलेले नाहीत. यासाठी योगेश चौधरी, अमित पाटील, रामकृष्ण वागराळे, सागर पाटील, अभिषेक हांडे, रोहित कदम, उदय साळोखे, विनोद हाजुराणी, रवीकुमार, गणेश तटकरे यांचे पथक कार्यरत आहे.

हेही वाचा : राज्यात उद्या चक्का जाम; आंदोलन आणखी तीव्र करणार – राजू शेट्टी

अयोध्या, उज्जैन उजळले

यापूर्वी अयोध्या येथे दिवाळीसाठी राम मंदिर परिसरामध्ये तसेच उज्जैन येथील महाकाल मंदिर येथे कोल्हापूरच्या या पथकाने खास लेसर लाईट सादर केला होता. दुबई येथे झालेल्या लग्न समारंभामध्ये ६० लेसर लावल्याने हा सोहळा उजळला होता.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur youth laser show at ind vs aus final match narendra modi stadium css
Show comments