कोल्हापूर : लाडकी बहीण योजनेमुळे महिला वर्ग महायुतीच्या बाजून झुकेल, काँग्रेसचे हक्काचे मतदानही महायुतीला होईल या भितीने काँग्रेसकडून विरोधाचे कॅम्पेन सुरू आहेत. आता ते फॉर्म भरुन घेतील आणि नंतर जमा करणार नाहीत. आणि निवडणुकीच्या तोंडावर सरकारने लाभ दिलाच नाही असा कांगावा करतील, अशी टीका खासदार धनंजय महाडिक यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार परिषदेमध्ये केली.
महाराष्ट्र राज्य शासनाने नुकताच अर्थसंकल्प जाहीर केला आहे या अर्थसंकल्पामध्ये लोकं कल्याणच्या जनतेच्या हिताच्या अनेक योजना आहेत त्याची माहिती यावेळी सविस्तरपणे देण्यात आली. पत्रकार परिषदेला माजी आमदार अमल महाडिक, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, राजवर्धन निंबाळकर, सत्यजित कदम, राहुल चिकोडे, नाथाजी पाटील, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाराणी निकम आदी उपस्थित होते.
हेही वाचा…कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपले; ‘पंचगंगे’चे पाणी पात्राबाहेर
महाराष्ट्राला विकासाची निश्चित दिशा देतानाच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा अर्थसंकल्प आहे, असा उल्लेख करून खासदार धनंजय महाडिक म्हणाले, अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि गतीमान विकासाचा आहे. महाराष्ट्राला विकासाची निश्चित दिशा देतानाच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. शेतकरी, महिला, युवक वर्ग, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक, गोरगरीब यांचा विचार करून राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला असून, या अर्थसंकल्पाची काही प्रमुख वैशिष्टय मांडत आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना मिळावा यासाठी भाजतर्फे फॉर्म भरण्याचे कॅम्प सुरू आहेत तसेच सुविधा केंद्र व अन्य सरकारी यंत्रणेद्वारेही या योजनेचे फॉर्म भरुन घेतले जातात. महिला वर्गांनी त्याचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले.
हेही वाचा…‘गोकुळ’च्या कार्यक्षेत्राबाहेरील गाय दूध खरेदी दरात दीड रुपयांची वाढ
शहर परिसरात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कॅम्पेनवरुन महाडिक यांनी काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वावर नाव न घेता निशाणा साधला. महाडिक म्हणाले, ‘कोल्हापूर दक्षिण, कसबा बावडा येथे काँग्रेसकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म महिलांकडून भरुन घेतले जात आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे महिला वर्ग महायुतीच्या बाजून झुकेल, काँग्रेसचे हक्काचे मतदानही महायुतीला होईल या भितीने कॉँग्रेसकडून कम्प सुरू आहेत. आता ते फॉर्म भरुन घेतील आणि नंतर जमा करणार नाहीत. आणि निवडणुकीच्या तोंडावर सरकारने लाभ दिलाच नाही असा कांगावा करतील.
हेही वाचा…विशाळगड अतिक्रमण मुक्त करावा; हिंदुत्ववाद्यांची मागणी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाही लाँगलाइफ चालणारी आहे. येत्या भाऊबीजेला महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होतील. महायुती सरकारच्या या योजनेचे महिलावर्गातून स्वागत होत आहे. मात्र काँग्रेस व विरोधक मंडळी टीका करत आहेत. त्यांच्याकडून कौतुकाची अपेक्षा नाही. शिवाय विरोधकांनी या योजनेविषयी, आर्थिक तरतुदीविषयी बिलकूल चिंता करू नये.