कोल्हापूर : ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर, गोहत्या यासंह विविध समस्या सध्या हिंदूंसमोर आहेत. अचानक रावण, महिषासूर यांना आदर्श मानणारे लोक सिद्ध होत आहेत. ज्या ज्या भागात हिंदूंची लोकसंख्या अल्प होत आहे तो तो भाग असुरक्षित बनतो. ख्रिस्ती आणि मुस्लीम संस्थांना विदेशातून धर्मांतरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे यापुढील काळात हिंदूंनी देव, देश, धर्म यांचे कार्य व्यापक स्तरावर करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन विश्‍व हिंदु परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी केले. ते कणेरी मठ येथे आयोजित संत संमेलनात बोलत होते.

या प्रसंगी व्यासपीठावर प.पू. काडसिद्धेश्‍वर स्वामीजी, निपाणी येथील प.पू. प्राणलिंग स्वामीजी, विहिंपचे प्रांतसंघटनमंत्री संजय मुद्राळे, विश्‍व हिंदु परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक् कुंदन पाटील उपस्थित होते. स्वागत विभागमंत्री शिवजी व्यास यांनी केले.

lavasa loksatta news,
लवासा प्रकरण : सीबीआय चौकशीची मागणी कशाच्या आधारे ? उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना विचारणा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
significance of Vasant Panchami
Vasant Panchami: वसंत पंचमी आणि निजामुद्दीन दर्गा यांचा काय संबंध?
Mumbai High Court dismissed a petition demanding an ED inquiry against Valmik Karad.
वाल्मिक कराडच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या ईडी चौकशीची मागणी; न्यायालयाने प्रश्न उपस्थित करून याचिका फेटाळली
Pannuns Sikhs for Justice is dangerous to India
खलिस्तानी अतिरेकी पन्नूनची ‘सिख्स फॉर जस्टीस’ संघटना भारतासाठी धोकादायक का आहे?
Salwan Momika Iraqi man burned Quran in Sweden shot dead
मशिदीसमोर कुराण दहन करणाऱ्या व्यक्तिची गोळ्या घालून हत्या; कोण होते सलवान मोमिका?
Malankara Jacobite Dispute
Malankara Jacobite Dispute : “धार्मिक स्थळांवर बळाचा वापर करणं वेदनादायी”, केरळमधील चर्च वादावर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी!
spa, massage center , High Court,
स्पा, मसाज सेंटरमधील कामकाजाचे नियमन होणार, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

या संमेलनासाठी विहिंपचे जिल्हामंत्री अनिल दिंडे, मिलिंद लिंबाणी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनिरुद्ध कोल्हापूरे, ह.भ.प. विठ्ठलतात्या पाटील, प.पू. ईश्‍वरबुवा रामदासी, प.पू. मौनी महाराज यांसह सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संत, महंत, वारकरी संप्रदायांचे प्रमुख, हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी वाचा-कोल्हापुरात मतमोजणी सुविधांची उभारणी दहा दिवस आधीच पूर्ण होणार; जिल्हाधिकारी, अमोल येडगे यांचे प्रशासनाला निर्देश

परांडे पुढे म्हणाले, ‘स्वातंत्र्यानंतर नागालँड, मिझोराम यांसारख्या राज्यांमध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात धर्मांतरीत झाल्याने या राज्यात हिंदु धर्मीय अल्पसंख्य झाले आहेत. महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यांमधील ग्रामीण भागांत धर्मांतराचे कार्य जोरात चालू आहे. यासाठी आपल्याला हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था करावी लागेल.

पुन्हा एकदा भारत अखंड होण्याचा संकल्प

पूर्वी एकसंघ असलेला भारत आज खंडित झाला आहे. आपली अनेक शक्तीपिठे ही पाकिस्तान-बांगलादेश येथे आहेत. सिंधू नदी आपल्याकडे नाही. पाणिनीचे जन्मस्थान पाकिस्तानमध्ये आहे. त्यामुळे हे जर परत मिळावायचे असेल, तर शास्त्र, सदाचार यांसोबत सामर्थ्य, शक्ती यांची उपासना आपल्याला करावी लागेल. जसा आपण श्रीराम मंदिराचा संकल्प पूर्ण केला त्याचप्रकारे यापुढील काळात आपल्याला भारत अखंड होण्याचा संकल्प परत एकदा करावा लागेल.

हिंदूंचा घटणारा जननदर चिंतेची गोष्ट !

भारतात हिंदूंचा जननदर हा १.९२ असून मुसलमानांना जननदर हा २.३ इतका आहे. हिंदूंची संख्या सातत्याने घटत असून शहरी भागांमध्ये ‘हम दो -हमारा एक’, अशी स्थिती आहे. लष्करामध्ये २१ सहस्त्र वरिष्ठ अधिकार्‍यांच्या जागा युवक मिळत नसल्याने रिक्त आहेत. त्यामुळे सातत्याने घटणारा हिंदूंचा जन्मदर ही चिंतेची गोष्ट आहे, असे मत मिलिंद परांडे यांनी व्यक्त केले.

आणखी वाचा-कोल्हापुरातील तृतीयपंथीयांच्या ‘फॅशन शो’ने मिळवली वाहवा; रिया मयुरी आळवेकर विजेती

केरळसारख्या राज्यात हिंदू आज अल्पसंख्य होत आहेत. समुद्रकिनारी हिंदू असलेले कोळी बांधव धर्मांतरीत होत आहेत. संभाजीनगरजवळ असलेले एक पूर्ण गाव ‘वक्फ बोर्डा’ने त्यांची संपत्ती म्हणून घोषित केले. याला हिंदूंनी संघटिपणे विरोध करून हा प्रयत्न हाणून पाडला. हिंदु धर्मात आज काही संघटनांकडून विद्वेष पेरण्याचे काम चालू आहे. संत हे अखिल समाजासाठी काम करतात. दुर्दैवाने संतांनाही आज जातींमध्ये विभागण्याचे काम चालू आहे. अशा प्रकारे जातींमध्ये भांडणे लावणार्‍यांपासून आपण सावध झाले पाहिजे. देशात वर्षाला ४० सहस्त्र मुलींचे गायब होत असून या कुठे जातात ? त्यांचे पुढे काय होते यावर कुणीही गांभीर्याने विचार करत नाही. त्यासाठी आपण प्रत्येकाने जागृत होऊन संघटिपणे कृती करण्याची आवश्यकता आहे.’

या प्रसंगी विविध मान्यवरांनी धर्मकार्यात ते कशाप्रकारे योगदान देऊ शकतात, तसेच ते कशाप्रकारे धर्म प्रसाराचे कार्य करत आहेत या संदर्भात त्यांचे अनुभव, तसेच या संदर्भातील त्यांच्या सूचना केल्या. सुहास लिमये, मयुर कुलकर्णी, केसरकर, संजय खाडे, संग्रामसिंह खाडे यांसह अन्य मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

आणखी वाचा-प्रामाणिकपणाची अशी ही ‘सृष्टी’; कोल्हापुरातील नऊवर्षीय बालिकेने प्रामाणिकपणे परत केली पैसे, दागिन्याची पर्स

या प्रसंगी लिंगेश्‍वर (जिल्हा सांगली) येथील साध्वी जानकीमाताजी म्हणाल्या, ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून सागरेश्‍वर अभयारण्य येथे असलेले श्रीराम मंदिर हे वनक्षेत्रात असून तेथे उपासना करणे, पूजा करणे यांसह विविध धार्मिक कृती करतांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. येथे त्यासाठी यातून मार्ग निघण्यासाठी प्रयत्न व्हावेत.

संघाचे अडीच लाख प्रकल्प सुरू

या प्रसंगी प.पू. काडसिद्धेश्‍वर स्वामीजी म्हणाले, ‘वारकरी संप्रदाय हा देशासाठी आदर्श आहे. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नसून वारकरी सर्वांना एकच समजतात. विश्‍व हिंदु परिषद-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे कार्य देशभरात व्यापक स्वरूपात चालू असून त्यांच्या वनवासी कल्याणाच्या सेवा कार्यास तोड नाही. देव, देश, धर्म यांसाठी संघाचे अडीच लाखापेक्षा अधिक प्रकल्प चालू आहेत.

Story img Loader