अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनेलने आघाडी घेतली आहे. सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या प्रक्रियेला प्रत्यक्ष मतमोजणी होऊन पहिला निकाल हाती येण्यास रात्र उजाडली. समर्थ पॅनेलच्या अभिनेत्री वर्षा उसगावकर, रंगभूषा गटातून चैताली डोंगरे, ध्वनिरेखन गटातून शरद चव्हाण, कामगार गटातून रणजित जाधव यांनी बाजी मारली. रात्री उशिरापर्यंत इतर ९ विभागांची मतमोजणी सुरू होती.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. पुणे, मुंबई, कोल्हापूर या तिन्हीही केंद्रांची एकत्रित मोजणी कोल्हापुरातील राम गणेश गडकरी हॉलमध्ये झाली. दुपारच्या भोजनाची सुट्टी होताच मतमोजणी हाती घेण्यात आली. यामध्ये सुरुवातीला स्थिर चित्रण, संकलन, रंगभूषा, ध्वनिरेखन आणि अभिनेत्री या पाच विभागांची मतमोजणी हाती घेण्यात आली. या पाच विभागात मेघराज भोसले यांच्या समर्थ पॅनेलने आघाडी घेतली होती. रात्री उशिरापर्यंत इतर ९ विभागांची मतमोजणी सुरू होती. मतमोजणीच्या सुरुवातीलाच सर्वच पॅनेलनी आपल्या विजयाचा दावा केला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा