कोल्हापूर : उस दरावरून राजू शेट्टी यांनी वातावरण तापवले असताना कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजू शेट्टी यांच्यासारखे नेते राहिले पाहिजेत; नाहीतर कारखानदार वळणावर येणार नाहीत, असे विधान केले आहे. याचवेळी मुश्रीफ यांनी ऊस दरावरून विनाकारण संघर्षाचे वातावरण निर्माण करू नये, असे आवाहन शेट्टी यांना केले आहे.
कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, राजू मागील हंगामातील प्रति पण चारशे रुपये देणे कारखानदारांना शक्य नाही हे मी कारखानदार म्हणून दार म्हणून नव्हे तर जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून बोलत आहे कारखान्यांवर आर्थिक बोजा वाढला आहे. एफआरपी तीन टप्प्यात दिली असती तर शंभर रुपये वाढवून देणे शक्य झाले असते.
आणखी वाचा-…तर लोकसभा निवडणूक लढवणार नाही; राजू शेट्टींचं आवाडेंना प्रत्युत्तर
त्यामुळे दरावरून विनाकारण संघर्षाचे वातावरण निर्माण करू नये. सगळी सोंगे करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही. राजू शेट्टी यांच्यासारखे नेते राहिले पाहिजेत. नाहीतर कारखानदार वळणावर येणार नाहीत. या विषयावर शेट्टी यांच्याबरोबर सतेज पाटील आणि विनय कोरे यांचा संवाद सुरू आहे, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.