कोल्हापूर : कोल्हापुरातील एका तरुणाला श्वान दंश झाल्यानंतर रेबीज रोगाने मृत्यू झाला. यामुळे कोल्हापूरकरांच्या भावना तीव्र झाले आहेत. यातूनच श्वानदंश कायद्यात बदल करण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहून पाठवले आहे.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्वान दंशाने पिडीत लोकांच्या वतीने प्राणी दया कायदा नागरीकांच्या जीवावर उठला आहे, तो रद्द करा किंवा बदल करा, असे साकडे अर्जाद्वारे केले आहे. येथील ज्येष्ठ पत्रकार, लेखक, डॉक्टर सुभाष देसाई आणि २४ लोकांना पिसाळलेले कुत्रे चावले होते. त्यानंतर गडहिंग्लजलाही त्याची पुनरावृत्ती झाली.   

हेही वाचा >>> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी महिला दिनाचा कार्यक्रम अभूतपूर्व होईल – धैर्यशील माने

कोल्हापूर शहरांमध्येही भटक्या कुत्र्याने अनेकांचा चावा घेतला. त्यामध्ये २१ वर्षाची ग्राफिक डिझाईनर तरुण मुलीचा या आठवड्यात अंत झाला. त्यावर जनतेच्या तीव्र व अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया सर्व वृत्तपत्रांत उमटत आहेत. 

या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्रातील सुपुत्र धनंजय चंद्रचूड हे काहीतरी ठोस करतील, या आशेने त्यांना लक्ष देण्याची विनंती करण्यात आली आहे. या पत्रामध्ये असे म्हटले आहे की, भटक्या कुत्र्यांचा व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे आबाल वृद्धांच्या मृत्यूचे प्रमाण भयानक वाढले आहे. सरकारी दवाखान्यात अनास्था रुग्णांच्या जीवावर बेतते . ग्रामपंचायती पासून महापालिकेपर्यंत कुत्र्याच्या निर्बीजीकरण करण्याच्या यंत्रणा निष्क्रिय आहेत. सरपंच, आमदार ,खासदार ,पालकमंत्री या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. सारे प्राण्याबद्दल भूतदयेच्या कायद्याचे कारण पुढे करतात.

हेही वाचा >>> निवडणुका आल्‍या की विशिष्‍ट धर्म निशाण्‍यावर, आमदार बच्‍चू कडू यांची राणा दाम्‍पत्‍यावर टीका

‘तो’ कायदा लोकांच्या जीवावर

खासदार मनेका गांधी यांनी जो कायदा करायला लावला तो आता नागरिकांच्या जीवावर उठला आहे त्यामुळे तो रद्द तरी करावा किंवा त्यात बदल तरी करावा.कोल्हापूर जिल्ह्यातील जाणकार वकील आणि एनजीओजनी, सामाजिक संस्थांनी याबाबत या प्रश्नावर गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती डॉक्टर सुभाष देसाई यांनी केली आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Letter sent to cji dhananjay chandrachud regarding changes in dog bite laws zws